ब्रेकिंग

लोडशेडिंग विरोधात संगमनेरात काँग्रेस आक्रमक

महावितरण कार्यालयावर संगमनेरातील नागरिकांचा संतप्त मोर्चा

लोडशेडिंग विरोधात संगमनेरात काँग्रेस आक्रमक

जाहिरात मो-7756055359

महावितरण कार्यालयावर संगमनेरातील नागरिकांचा संतप्त मोर्चा

संगमनेर । प्रतिनिधी । मा. कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवून अत्यंत वैभवशाली व सुरक्षित शहर म्हणून संगमनेरची राज्यात ओळख निर्माण झाली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून महावितरण कार्यालयाकडून भारनियमच्या नावाखाली सातत्याने अनियमित, खंडित होणारा वीजपुरवठा केला जातो. यामुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहे त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचा रोष वाढत असून तातडीने यावर उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी आज नागरिकांनी एमएसईबी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.
संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे , सौ अर्चनाताई बालोडे, निखिल पापडेजा ,वैष्णव मूर्तडक , गुंजाळवाडी चे सरपंच अमोल गुंजाळ,आनंद वर्पे , शेखर सोसे, सौ शितल उगलमुगले, उज्वला राहणे, ज्योती पवार ,प्रीतम साबळे, डॉ. विजय पवार, सागर पावसे, दीपक शिंदे,अनिल घुगे ,चंद्रकांत घुगे, निलेश सांगळे ,भाऊसाहेब सांगळे, सागर सांगळे, जयप्रकाश मंडलिक, विशाल घुगे, नामदेव सोनवणे ,रमेश काकड, आयान शेख, गौरव पेंडवाजे, दत्तात्रय गळंगे, आनंद वर्पे, तात्या कुटे, सोमनाथ जोंधळे यांसह मान्यवर उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सध्या दररोज सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत विद्युत पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे नागरिकांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. सायंकाळची वेळ ही विद्यार्थ्यांच्या शाळेतून घरी येण्याची असून पावसाळी दिवस असल्याने अंधार लवकर पडतो त्यामुळे रस्त्याने येताना हिंस्र प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वीज उपलब्ध होत नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोठ्यात जाऊन गाई म्हशींचे दूध काढणे व त्याची साफसफाई करणे ही सगळी कामे अंधारात करावी लागतात हे करणे खूप अवघड आहे.या सर्व समस्यांमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तरी या सर्व गोष्टींचा विचार करून प्रशासनाने विद्युत पुरवठा संध्याकाळी करू नये. अखंडित अनियमित वीज पुरवठ्यावर तातडीने तोडगा काढावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही डॉ. जयश्रीताई थोरात यांसह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.  यावेळी महावितरणचे  कार्यकारी अभियंता वट्टमवार यांनी हे निवेदन स्वीकारले व तातडीने उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले.

  • खंडित होणारा वीज पुरवठा ही चिंतेची बाब – डॉ.जयश्रीताई थोरात

    मागील अनेक दिवसांपासून संगमनेर शहरासह ग्रामीण भागामध्ये विजेचा प्रश्न ऐरणीवर आहे. महावितरण या गोष्टीकडे प्राधान्याने लक्ष देत नाही. तालुक्यात वीजपुरवठा कमी दाबाने व वेळी सुरू आहे. महावितरण कडे विचारणा केल्यास त्यांच्याकडे कोणतीही ठोस कारण नाही हे अत्यंत चुकीचे आहे. यावर तातडीने मार्ग काढावा अन्यथा तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरून महावितरण कार्यालय विरोधात तीव्र आंदोलन करतील असा इशाराही डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिला आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!