बहादरपुर गावचे सरपंच गोपीनाथ रहाणे यांना आदर्श सरपंच पुरस्कार
मला मिळालेला पुरस्कार हा गावातील ग्रामस्थांचे असलेले पाठबळ
बहादरपुर गावचे सरपंच गोपीनाथ रहाणे यांना आदर्श सरपंच पुरस्कार
कोपरगाव । विनोद जवरे ।
कोपरगाव तालुक्यातील बहादरपूरचे लोकनियुक्त सरपंच गोपीनाथ रहाणे यांना महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्याच्या वतीने सन 2023 सालचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार सुधीर तांबे,आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील,सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पाटील पावसे व महाराष्ट्रातील अनेक दिग्गज आदर्श सरपंचाच्या उपस्थितीत अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला
तसेच सरपंच सेवा संघ सघाच्या कोपरगाव तालुका अध्यक्ष पदी देखील निवड पत्र या कार्यक्रमात सरपंच रहाणे यांना देण्यात आले
गेली अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेले श्री गोपीनाथ रहाणे यांनी 2018 पासून ग्रामपंचायत उपसरपंच पदी असताना वृक्षजीवन फाउंडेशनची स्थापना करून गावात लोकसहभागातून वृक्ष लागवड, रक्तदान शिबिरे, श्रमदान शिबीरे,शाळा,यावर प्रभावी काम केल्यामुळे तत्कालीन पालक मंत्री राम शिंदे, अण्णा हजारे यांच्या उपस्थित फाउंडेशनला युवा आयडॉल पुरस्कार 2019 साली मिळाला होता
त्याचप्रमाणे आताही जनतेने मोठ्या मताधिक्याने जनतेतून निवडून दिल्यानंतर 1 वर्षात लोकप्रतिनिधीं, जिल्हा परिषद ,पंचायत समितीच्या माध्यमातून सार्वजनिक आणि वयक्तिक लाभाची सर्व विभागातून जवळपास 10 कोटी रुपयाचे कामे गावात आणण्यासाठी यश मिळाले
तसेच गावातील जास्तीत जास्त कुटुंब विमा सुरक्षित केल्यामुळे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वतीने 2023. सालचा विमाग्राम पुरस्कार व 75 हजार रुपयाचे पारितोषिक बहादरपूर ग्रामपंचायतला गेली 4 महिन्यापूर्वी मिळालेले आहे रस्ते डांबरीकरण,खडीकरण,पेव्हर ब्लॉक बसविणे, काँक्रिटीकरण करणे,अमरधाम सुशोभीकरण, जलसंधारणातून पाझर तलाव दुरुस्ती, अंगणवाडी बांधकाम, स्वच्छ भारत मिशन अंतर्गतची कामे,तसेच 15 वा वित्त आयोग अंतर्गतची कामे , सार्वजनिक शौचालय ,गावात आठवडा बाजार भरविणे,सार्वजनिक ठिकाणी सी सी टी व्हीं कॅमेरे, विमाग्राम तसेच वयक्तिक लाभात प्रधानमंत्री, शबरी,रमाई, मोदी घरकुल योजना, वयक्तिक शौचालय,महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर, गाय गोठा, समाज कल्याण अंतर्गत लेडीज सायकल, कडबा कुट्टी यंत्र,पिठाची गिरणी, तसेच संजय गांधी श्रावण बाळ, महिला बालकल्याण, बांधकाम कामगार योजना, सारख्या विविध योजनेतून गावातील दुर्बल घटकांना लाभ देण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केल्यामुळे याचीच दखल घेत सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श सरपंच सेवा संघामध्ये तालुका अध्यक्ष पदी निवड व आदर्श सरपंच पुरस्कार श्री गोपीनाथ राहणे यांना प्रदान करण्यात आला
मला मिळालेला पुरस्कार हा गावातील ग्रामस्थांचे असलेले पाठबळ आणि तालुक्याचे कृतिशील आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वेळोवेळी असणाऱ्या मार्गदर्शनाचे व सहकार्याचे हे प्रतीक आहे असे प्रतिपादन लोकनियुक्त सरपंच श्री गोपीनाथ रहाणे यांनी केले आहे