ब्रेकिंग
जानेवारीतील जयंती महोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेण्याचे आवाहन
जानेवारीतील जयंती महोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन

संगमनेर । विनोद जवरे ।
अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त जानेवारी मध्ये होणाऱ्या भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा समावेश असलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रम ही होणार असून याकरता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन रजिस्ट्रार आचार्य बाबुराव गवांदे यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना गवांदे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी जयंती महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. यामध्ये तालुक्यातील विद्यार्थ्यांना सहभाग घेता यावा यापैकी सांस्कृतिक महोत्सवाच्या तीन दिवसाच्या कार्यक्रमांपैकी एक दिवसांमध्ये विद्यार्थ्यांचे गुणदर्शन कार्यक्रम होत असतात.

यावर्षीही या कार्यक्रमाचा समावेश असून यामध्ये आदिवासी नृत्य, भांगडा नृत्य, चित्रपट गीते, नाविन्यपूर्ण गीते, गवळण, पोवाडा ,लावणी, नृत्य, कव्वाली, एकपात्री प्रयोग, नाट्यछटा या कार्यक्रमांचा समावेश आहे.तरी या कार्यक्रमात सहभाग होण्यासाठी कलाशिक्षक व शाळांनी आपले नावे 30 डिसेंबर २०२३ पूर्वी सह्याद्री संस्थेच्या मुख्य कार्यालयात संजय आहेर यांच्याकडे जमा करावी. यानंतर निवड समिती सदस्य नामदेव गायकवाड ,रामदास तांबडे, आचार्य बाबुराव गवांदे, संजय आहेर, अनिल थोरात यांच्या माध्यमातून कार्यक्रम निश्चित करण्यात येणार असून जयंती महोत्सवाच्या भव्य दिव्य होणाऱ्या स्टेजवर या विद्यार्थ्यांना कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळणार आहे. तरी या कार्यक्रमांमध्ये संगमनेर तालुका व अकोले तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आव्हान जयंती महोत्सव समिती व अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.