ब्रेकिंग

पत्रकारांच्या प्रश्नांबाबत आ सत्यजित तांबे यांनी सरकारचे लक्ष वेधले

पत्रकारांचे विविध प्रश्न सरकारने तातडीने मार्गे लावावे - आ. सत्यजित तांबे

पत्रकारांच्या प्रश्नांबाबत आ सत्यजित तांबे यांनी सरकारचे लक्ष वेधले

पत्रकारांचे विविध प्रश्न सरकारने तातडीने मार्गे लावावे – आ. सत्यजित तांबे

संगमनेर । विनोद जवरे ।

लोकशाही मधील पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचे आरोग्य विषयक, याचबरोबर वेतन, मानधनासह अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यांनी शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. मात्र त्याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नसून तातडीने याबाबत बैठक घेऊन पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावावी अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे युवक आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत औचित्य च्या मुद्द्याद्वारे आमदार सत्यजित तांबे मागणी करताना म्हणाले की, पत्रकारांच्या अनेक मागणी असून त्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. विविध मागण्यांसाठी पत्रकारांनी सातत्याने प्रयत्न केला आहे. मात्र अद्यापही ठोस कार्यवाही झाली नाही . लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ असावे. केंद्र सरकारच्या धरतीवर राज्यातील डिजिटल पत्रकार नियमावली असावी . सातत्याने धावपळ करत असलेल्या पत्रकारांचे नेहमी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते .याचबरोबर कुटुंबाकडेही दुर्लक्ष होत असते .धावपळ करणारा हा लोकशाहीचा आधारस्तंभ कायम उपेक्षित राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाने अत्यंत गांभीर्यपूर्वक पाहून प्रश्न मार्गी लावले पाहिजे .याकरता राज्यातील संपादक सेवा संघ, मराठी पत्रकार संघ, श्रमिक पत्रकार संघ यांचे सह विविध पत्रकार संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

 त्यामुळे लवकरात लवकर या सर्व संघटनांच्या एक -एक प्रतिनिधी बरोबर बैठक घेऊन त्यांचे प्रश्न त्वरित सोडवावे अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे.
यावर सभापती नामदार नीलम गो-हे यांनी सांगितले की, पत्रकारांच्या प्रश्नाबाबत मागील अधिवेशनात मंत्री शंभूराज देसाई यांना अभ्यास समितीचा अहवाल डिसेंबरच्या अधिवेशनापर्यंत द्या अशा सूचना केल्या होत्या. या अहवालाचा सारांश मागवला जाईल. युवक आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकारांसाठी मांडलेला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून विविध पत्रकार संघटना व डिजिटल मीडियाच्या बाबत माहिती संचालनालय व संघटना यांच्या सूचना नोंदणीसाठी मागून घ्याव्या व याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन अर्थसंकल्पामध्ये याबाबत तरतूद करावी अशी सूचना केली. यावर उपस्थित मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जानेवारी बाबत पत्रकारांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेण्याची मान्य केली पत्रकारांच्या विविध प्रश्नां बाबत थेट विधान परिषदेत प्रश्न मांडून आवाज उठवल्याबद्दल युवक आमदार सत्यजित तांबे यांचे संगमनेर व अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, मुंबई पुणे ,नागपूर, जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसह राज्यभरातील विविध पत्रकार संघटनांनी अभिनंदन केले आहे
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!