रोहमारे करंडक छ. संभाजी नगरच्या माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाने पटकावला


रोहमारे करंडक छ. संभाजी नगरच्या माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाने पटकावला

कोपरगाव । प्रतिनिधी । के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या के. बी. रोहमारे स्मृति-करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा मानाचा के. बी. रोहमारे करंडक माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, छ. संभाजीनगरच्या आदित्य दराडे व वैभव बंगाळे या संघाने सर्वाधिक गुण मिळवून पटकावला. या संघाला रोहमारे स्मृति-करंडक व रोख रुपये २१००/- तसेच इतर वरिष्ठ व कनिष्ठ दोन्ही गटातील वैयक्तिक पारितोषिके मा. सुधीर डागा व मा. संदीप रोहमारे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली, अशी माहिती प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी येथे दिली.

वैयक्तिक प्रथम क्रमांक रुपये ७०००/-आदित्य दराडे (माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, संभाजीनगर), वैयक्तिक द्वितीय क्रमांक रुपये ५०००/- मेघा सोनवणे (के. जे. सोमैया महाविद्यालय कोपरगाव) तृतीय क्रमांक रुपये ३०००/- आकांक्षा नरवडे (अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मंचर, पुणे) यांनी तर उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी रुपये १०००/- ईश्वरी निंबाळकर (सुशीलामाई काळे महाविद्यालय, कोळपेवाडी) व वैभव बंगाळे (माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, संभाजीनगर) यांनी पटकावले.कनिष्ठ गटातील वैयक्तिक पारितोषिके प्रथम रुपये ४०००/- माएशा फैयाज शेख (श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, श्रीगोंदा) द्वितीय रुपये ३०००/- अंजली निलेश चिखले (के. बी. रोहमारे महाविद्यालय कोपरगाव) तृतीय रुपये २०००/- राजवीर कैलास खरारे (उच्च माध्यमिक विद्यालय कासमपुरा पाचोरा, जळगाव) तर उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी रुपये ५००/- व दर्शन विजय चौधरी (अगस्ती कनिष्ठ महाविद्यालय, अकोले) ईश्वरी विजय वाकचौरे (एस. एस. जी. एम. कनिष्ठ महाविद्यालय, कोपरगाव) यांनी पटकाविली. याशिवाय वरिष्ठ गटातील ऋतुजा बनकर (अगस्ती महाविद्यालय, अकोले) व आश्विनी सांगळे (एन. पी. विधी महाविद्यालय, कोपरगाव) तसेच कनिष्ठ गटात पूनम गायकवाड व प्रतीक्षा धोत्रे (विनायकराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, वैजापूर) या स्पर्धकांना प्रत्येकी रुपये ५००/- ची विशेष पारितोषिके देखील प्रदान करण्यात आली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, छ. संभाजीनगर, नांदेड, सांगोला आदी जिल्ह्यातील 70 स्पर्धकांनी सहभाग नोंदवत स्पर्धेत रंगत आणली.

पारितोषिक वितरण समारंभापूत सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करताना कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा. संदीप रोहमारे यांनी आपले आजोबा कै. के. बी. रोहमारे यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक तसेच प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान अधोरेखित केले. प्रमुख अतिथी मा. सुधीर डागा यांनी विजेत्या स्पर्धकांबरोबरच इतरही सर्वच स्पर्धकांची भाषणे अतिशय प्रेरक व जोशपूर्ण झाल्याचे सांगत रशिया मध्ये कोरा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्याला देखील काही गुण दिले जातात, अशी टिप्पणी करून सर्वच स्पर्धकांच्या परिश्रमाला दाद दिली. मा. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी यशस्वी आणि इतर सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. परीक्षक डॉ. बळीराम धापसे, प्रा. सुनील कांडेकर, प्रा. अमोल चिने व प्रा. जावेद शहा यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. स्पर्धेचे समन्वयक डॉ. जिभाऊ मोरे व सह समन्वयक डॉ. रवींद्र जाधव यांनी पारितोषिकांचे वाचन केले तर प्रा. ए. एफ. सूर्यवंशी व प्रा. आर. जी. मरभळ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बी. बी. भोसले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे, डॉ. संतोष पगारे, डॉ. वसुदेव साळुंके, डॉ. महारुद्र खोसे, डॉ. नामदेव ढोकळे, डॉ. संजय दवंगे, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे इतर प्राध्यापक वृंद व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.



