कॅन्सर आणि हृदयरोगावरील अत्याधुनिक उपचार आता कोपरगावातच!
SJS हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्यांसाठी मोफत उपचारांची सुविधा; आयुष्मान भारत व जनआरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रियांचाही लाभ

कॅन्सर आणि हृदयरोगावरील अत्याधुनिक उपचार आता कोपरगावातच!


SJS हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्यांसाठी मोफत उपचारांची सुविधा; आयुष्मान भारत व जनआरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रियांचाही लाभ
कोपरगाव । विनोद जवरे । कॅन्सर आणि हृदयरोगासारख्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी यापुढे पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज कोपरगावकरांना भासणार नाही. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे सुरू असलेल्या SJS हॉस्पिटलमध्ये कॅन्सर व हृदयरोगावरील अत्याधुनिक उपचारांसह विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, पात्र रुग्णांना आयुष्मान भारत व जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार आणि शस्त्रक्रियांचा लाभ मिळणार असल्याने सर्वसामान्य रुग्णांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे.

SJS हॉस्पिटलमध्ये कॅन्सर विभागाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कॅन्सरचे निदान, कॅन्सरवरील विविध शस्त्रक्रिया, केमोथेरपी तसेच अमेरिकन तंत्रज्ञानाच्या कॅन्सर मशीनद्वारे रेडिएशन थेरपीची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांना एकाच ठिकाणी निदानापासून उपचारापर्यंतच्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.हृदयरोग विभागामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी यांसारख्या महत्त्वपूर्ण उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र रुग्णांना संबंधित शासकीय आरोग्य योजनांच्या निकषांनुसार या उपचारांचा मोफत लाभ घेता येणार आहे.
जाहिरात बातमी साठी संपर्क पत्रकार विनोद जवरे
मो-7756045359
हॉस्पिटलमध्ये केवळ कॅन्सर आणि हृदयरोग उपचारच नव्हे, तर सर्वसामान्यांच्या विविध आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन अनेक विभाग सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटर, अतिदक्षता विभाग (ICU), २४ तास आपत्कालीन सेवा, नवजात शिशू व बालरोग विभाग, प्रसूती व स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग, मेडिसिन, फिजिओथेरपी, नेत्ररोग, दंतचिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म आणि होमिओपॅथी विभागांचा समावेश आहे. तसेच पेट स्कॅन, सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स-रे, सोनोग्राफी, अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, नेफ्रोलॉजी व डायलिसिस युनिट अशा महत्त्वपूर्ण तपासणी व उपचार सुविधाही उपलब्ध आहेत. अनुभवी डॉक्टरांची टीम, २४ तास वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका सुविधा तसेच रुग्णांच्या नातेवाइकांसाठी माफक दरातील निवास व्यवस्था यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

कोकमठाण येथील महर्षी शाळेजवळ, पेट्रोल पंपाच्या मागे मुंबई-नागपूर महामार्गालगत असलेले SJS हॉस्पिटल हे कोपरगावसह राहाता, शिर्डी, वैजापूर आणि परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र ठरू शकते. अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याचा हॉस्पिटलचा प्रयत्न आहे.गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना शासकीय आरोग्य योजनांच्या माध्यमातून उपचार मिळण्याची संधी उपलब्ध होत असल्याने SJS हॉस्पिटलची ही आरोग्यसेवा परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
संपर्क : ९६२३८३९०००
पत्ता : SJS हॉस्पिटल, महर्षी शाळेजवळ, पेट्रोल पंपाच्या मागे, मुंबई-नागपूर महामार्ग, कोकमठाण, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर.



