ब्रेकिंग

गुरुवार (दि.०५) रोजी कर्मवीर शंकररावजी काळे यांचे १४ वे पुण्यस्मरण

गुरुवार (दि.०५) रोजी कर्मवीर शंकररावजी काळे यांचे १४ वे पुण्यस्मरण
गुरुवार (दि.०५) रोजी कर्मवीर शंकररावजी काळे यांचे १४ वे पुण्यस्मरण
कोपरगांव । प्रतिनिधी । ग्रामीण विकासाचा पाया भक्कम करत शिक्षण, कृषी आणि सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा अजोड ठसा उमटविणारे माजी खासदार स्व. कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार (दि.०५) रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी दिली आहे.
गुरुवारी सकाळी ९ वाजता कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान येथे पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत ह.भ.प.उद्धव महाराज मंडलिक (सद्‌गुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठाण, श्री क्षेत्र नेवासा) यांचे सुश्राव्य हरिकीर्तन होणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण व समाजसेवेच्या विचारांचा वारसा पुढे घेवून जातांना स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रगतीची दारे खुली करतानाच कृषी आणि सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी त्यांनी अतुलनीय कार्य केले. शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण जनतेच्या आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य देत त्यांनी रुजविलेल्या सहकार चळवळीने कोपरगाव तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासाचा पाया भक्कम केला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्रगतीची नवी दिशा दाखविली.

कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास माजी आमदार अशोकराव काळे, गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे, आमदार आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्यासह कारखान्याचे उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, मित्र मंडळाचे सदस्य, संलग्न संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सहकार क्षेत्र, रयत परिवार तसेच स्व. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांवर प्रेम करणारे शेतकरी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि नागरिकांनी या पुण्यस्मरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे उपाध्यक्ष नारायणराव मांजरे यांनी केले आहे
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!