वयाची नव्वदी पार, तरी मतदानाचा उत्साह कायम!

वयाची नव्वदी पार, तरी मतदानाचा उत्साह कायम!


राहाता येथे ९३ वर्षीय विष्णू गोविंद विखे आणि ८७ वर्षीय पुंजा नाना धावणे यांनी बजावला मतदानाचा हक्क
राहाता । प्रतिनिधी ।अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राहाता येथे वयाची नव्वदी पार केलेल्या ज्येष्ठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली. ९३ वर्षीय विष्णू गोविंद विखे आणि ८७ वर्षीय पुंजा नाना धावणे यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. त्यांच्या या उत्साहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मतदान हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. मात्र, अनेकदा विविध कारणांमुळे नागरिक मतदानाकडे पाठ फिरवतात. अशा परिस्थितीत वयाची ऐंशी-नव्वदी पार केलेल्या या ज्येष्ठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना या दोन्ही ज्येष्ठ मतदारांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपले कर्तव्य पार पाडले. वय कितीही असले, तरी लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेणे महत्त्वाचे आहे, हा संदेश त्यांच्या कृतीतून मिळाला आहे.



