तेजस थोरात यांची बिसलेरी कंपनीत सेल्स ऑफिसरपदी निवड!

तेजस थोरात यांची बिसलेरी कंपनीत सेल्स ऑफिसरपदी निवड!

अमृतवाहिनी व्यवस्थापन महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; कुटुंबीयांसह परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव
संगमनेर । प्रतिनिधी । अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, संगमनेर येथील विद्यार्थी तेजस थोरात यांची नामांकित बिसलेरी इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनीमध्ये सेल्स ऑफिसर (Sales Officer) या पदावर निवड झाली आहे. प्लेसमेंट २०२६-२७ अंतर्गत मिळालेल्या या यशामुळे अमृतवाहिनी व्यवस्थापन महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक क्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

महाविद्यालयातील शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि व्यावसायिक कौशल्यांच्या जोरावर तेजस थोरात यांनी ही यशस्वी झेप घेतली आहे. नामांकित कंपनीत काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला नवी दिशा मिळणार आहे.विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अमृतवाहिनी व्यवस्थापन महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील आहे. तेजस थोरात यांच्या निवडीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.तेजस थोरात यांच्या या यशाबद्दल त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिसरातून अभिनंदन होत असून, पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.



