ब्रेकिंग
बुधवारी संगमनेर नगर परिषदेचे एक पणती स्वच्छतेची अभियान

मा.मंत्री बाळासाहेब थोरात,सौ.दुर्गाताई तांबे,आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत स्वच्छतेची जनजागृती
संगमनेर । प्रतिनिधी । महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगरपरिषदेने नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याबरोबर राज्य व राष्ट्रीय पातळीवर स्वच्छतेमध्ये सौ.दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पुरस्कार मिळवले आहेत. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेकडून एक पणती स्वच्छतेची या जनजागृती रॅलीचे बुधवार दिनांक 4 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 4 वा. सौ.दुर्गाताई तांबे यांच्या शुभहस्ते यशोधन कार्यालयापासून आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ.सौ. मैथिलीताई तांबे यांनी दिली आहे.

संगमनेरच्या सुंदर भविष्याच्या बाबत माहिती देताना नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याबरोबर पायाभूत व शाश्वत विकासाच्या योजना राबवल्या जाणार आहेत. याचबरोबर स्वच्छतेमध्ये सर्व नागरिकांना बरोबर घेऊन संगमनेर शहराला स्वच्छतेतून समृद्धीकडे नेण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे.दीपावलीच्या निमित्ताने बुधवार दिनांक 4 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 4 वाजता यशोधन कार्यालय येथून एक पणती स्वच्छतेची हे स्वच्छतेच्या जनजागृतीचे अभियान सुरू करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे हे उपस्थित राहणार असून संगमनेर शहराच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ होणार आहे. यावेळी डॉ.जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख सर्व सभापती तसेच नगरसेवक, नगरसेविका व सर्व माजी नगराध्यक्ष, व्यापारी, पदाधिकारी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी संगमनेरच्या सुंदर भविष्याच्या दृष्टीने होत असलेल्या स्वच्छतेच्या जनजागृती एक पणती स्वच्छतेची या रॅलीमध्ये शहरातील सर्व नागरिक महिला व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि मुख्याधिकारी डॉ.दयानंद गोरे व नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी केले आहे.