ब्रेकिंग

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्रांचा कायापालट; निधीची कमतरता भासू देणार नाही – विखे पाटील

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्रांचा कायापालट; निधीची कमतरता भासू देणार नाही – विखे पाटील

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्रांचा कायापालट; निधीची कमतरता भासू देणार नाही – विखे पाटील

नेवासा ।  प्रतिनिधी । कुंभमेळ्याच्या निमिताने शिर्डी आणि शनिशिंगणापूर देवस्थानने एकमेकांत सामंजस्य करार करून भाविकांना माहीतीची उपलब्धता करून द्यावी. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तिर्थक्षेत्रांच्या पायाभूत सुविधांच्या कामासाठी निधीची कमरता भासणार नाही.कुंभमेळ्याच्या निमिताने पूर्ण होणारी विकास काम परिसराच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरतील असा विश्वास जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

सिहंस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे ५९कोटी ४०लाख रुपयांच्या निधीतून विकसित होत असलेल्या शिंगणापूर ते कांगोणी राज्यमार्ग ६६,सोनई घोडेगाव काकणे राज्य मार्ग ६६ वरील लहान पुलाचे बांधकाम,सोनई कांगोणी ते अहिल्यानगर संभाजीनगर रस्त्याचे मजबुतीकरण कांगोणी खरवंडी आणि खरवंडी वडाळा बहीरोबा मार्गाच्या मजबुतीकरण कामाचा शुभारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.आ.विठ्ठलराव लंघे,प्रभाकर शिंदे किसनराव गडाख,संभाजीराजे दहातोंडे अंकुशराव काळे,प्रताप चिंधे नगराध्यक्ष करणसिंह घुले भाऊसाहेब वाघ,ॠषिकेश शेटे, यांच्यासह कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की,प्रयागराज प्रमाणे नासिक येथील सिंहस्थ कुंभ पर्व अध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या ऐतिहसिक व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नियोजन सुरू आहे.जिल्ह्याला असलेल्या अध्यात्मिक स्थळांचा यानिमित्ताने विकास करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणास विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.तिर्थक्षेत्रांच्या विकासामुळे परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेलच परंतू अध्यात्मिक पर्यटनातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील.नासिकला येणारे भाविक शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे येणार असल्याने या दोन्ही देवस्थानाच्या नियोजनाचे काम अतिशय चांगल्या पध्दतीने होण्याची आवश्यकता आहे. दोन्ही देवस्थान जागतिक स्तरावचे आहेत.येणार्या भाविकांना माहीतीची उपलब्धता व्हावी म्हणून शिर्डी आणि शनिशिंगणापूर देवस्थानने एकमेकांत सामंजस्य करार करून सर्व माहीती वेबसाइटवर उपलब्ध करून देण्याची सूचना मंत्री विखे पाटील यांनी केली.समृध्दी महामार्ग झाल्यानंतर भाविकांना येणे अत्यंत सोयीचे झाले आहे.शिर्डी विमानतळाच्या इमारतीसाठी सातशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून,विमानतळाचा विस्तार होणार असल्याने त्याचा लाभ जिल्ह्यातील अध्यात्मिक पर्यटनाला होईल.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खरीप आवर्तनाचे नियोजन अतिशय चांगल्या पध्दतीने झाले.तीस हजार हेक्टर क्षेत्राला त्याचा लाभ झाला.रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात आले असून,१५०बंधारे भरून देण्याचे नियोजन असून, मंत्री.शिंगवे तुकाईचे सर्व्हेक्षण दोन महीन्यात पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.आ.विठ्ठलराव लंघे यांनी आपल्या भाषणात नेवासा तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेवून मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या कामाचा आढावा घेवून श्रध्दा आणि भक्तीभावाने काम करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. शनिशिंगणापूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.देवस्थानची अंतर्गत सुविधा आणि पार्कींगसाठी निधी उपलब्ध झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!