ब्रेकिंग

महायुती सरकार ताजनापूर योजनेतून शेतकऱ्यांना न्याय देईल – ना.विखे पाटील

महायुती सरकार ताजनापूर योजनेतून शेतकऱ्यांना न्याय देईल – ना.विखे पाटील

महायुती सरकार ताजनापूर योजनेतून शेतकऱ्यांना न्याय देईल – ना.विखे पाटील

अहील्यानगर । प्रतिनिधी । महायुती सरकारच्या माध्यामातून ताजनापूर उपसा सिंचन योजनेच्या तिसर्या टप्प्याचे काम पूर्ण होईल. दुष्काळी भागातील गावांना न्याय देण्याच्या उद्देशाने जलसंपदा विभाग काम करेल आशी ग्वाही मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.ताजनापूर उपसा सिंचन योजनेकरीता निधीची उपलब्धता करून दिल्याबद्दल
लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार केला.आ.मोनिका राजळे अजय रक्ताटे यांच्यासह लाभ क्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.

ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा एकचे पुनरुज्जीवन करण्यासाठी यांत्रिकी विद्युत व स्थापत्य कामासाठी २०कोटी ८८लाख रुपयांचा निधी आणि तिसर्या टप्प्याच्या सर्सर्व्हेक्षणासाठी ६३लाख रुपयांच्या निधीस मंत्रालयात झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.झालेल्या महत्वपूर्ण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी तसेच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आ.मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री विखे पाटील यांचा सत्कार करून आभार मानले.तालुक्यातील आठ गावांमधील सुमारे २हजार ७४४हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.योजनेच्या टप्पा क्र एक विस्तारीत मध्ये १३ गावांचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून ताजनापूर उपसा सिंचन योजनेच्या तिसर्या टप्प्याचा निर्णय केला असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी शेतकरी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले.ताजनापूर उपसा सिंचन योजनेच्या तिसर्या टप्पा शेवगाव पाथर्डी तालुक्याकरीता ऐतिहसिक ठरणार असून,वर्षानुवर्ष दुष्काळाच्या सावटाखाली राहीलेल्या गावांना योजनेचा तिसरा टप्पा या गावांमधील शेतकऱ्यांच्या जीवनातील अमूलाग्र बदल करणारा ठरेल.भगवानगडाच्या पायथ्यापाशी ४६गावांच्या पाणी प्रश्नाबाबत नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान बैठक घेणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी आश्वासित केले.मंत्री विखे पाटील यांनी शेवगाव येथे टंचाई आढावा बैठकीत ताजनापूर उपसा सिंचन योजनेच्या तिसर्या टप्प्याच्या कामा संदर्भात शेतकऱ्यांना आश्वासित केले होते.त्याच्या कार्यवाहीला प्राधान्य देवून योजनेसाठी प्रशासकीय स्तरावर अवघ्या काही महीन्यात कार्यवाही सुरू झाल्याने दिलेल्या शब्दाची पूर्तता होणार असे त्यांनी ठामपणे सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!