ब्रेकिंग

बहादरपूरच्या सुपुत्राची जागतिक भरारी! डॉ. विजय रहाणे यांना IIT दिल्ली आणि ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड विद्यापीठाची संयुक्त पीएच.डी. पदवी

बहादरपूरच्या सुपुत्राची जागतिक भरारी! डॉ. विजय रहाणे यांना IIT दिल्ली आणि ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड विद्यापीठाची संयुक्त पीएच.डी. पदवी

बहादरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; रसायनशास्त्रातील संशोधनात्मक कामगिरीने गावाचे नाव सातासमुद्रापार

कोपरगाव । प्रतिनिधी । जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि ज्ञानाच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणही जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू शकतात, हे बहादरपूर गावचे भूमिपुत्र डॉ. विजय पोपट रहाणे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. बहादरपूर येथील पोपट नाथा रहाणे यांचे चिरंजीव डॉ. विजय रहाणे यांना भारतातील प्रतिष्ठित IIT दिल्ली आणि ऑस्ट्रेलियातील जागतिक दर्जाच्या Queensland University यांच्या संयुक्त विद्यमाने रसायनशास्त्र (Chemistry) विषयात संशोधनावर आधारित पीएच.डी. (Ph.D.) ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे बहादरपूर गावाच्या शैक्षणिक आणि सामाजिक वैभवात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ग्रामीण भागातून शिक्षणाचा प्रवास सुरू करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश संपादन करणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. डॉ. विजय रहाणे यांनी रसायनशास्त्र विषयात केलेले संशोधन, त्यासाठी घेतलेली मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचे हे फलित मानले जात आहे. IIT दिल्लीसारखी देशातील प्रतिष्ठित संस्था आणि ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मिळालेली ही पदवी त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.डॉ. विजय यांच्या या यशामागे त्यांची अभ्यासातील निष्ठा, संशोधनाची आवड, जिद्द आणि आई-वडिलांनी दिलेले संस्कार यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या यशाने केवळ कुटुंबीयांचाच नव्हे, तर बहादरपूर गावातील प्रत्येक नागरिकाचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीही हे यश निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. योग्य ध्येय, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर जागतिक स्तरावर यश संपादन करता येते, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.डॉ. विजय रहाणे यांच्या या जागतिक स्तरावरील शैक्षणिक यशाबद्दल श्री क्षेत्र बहादरपूर येथील समस्त ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. त्यांची पुढील शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील वाटचाल अधिक उज्ज्वल आणि यशस्वी होवो, अशी प्रार्थना श्री संत सद्गुरू गोपाजी बाबा व साईबाबांच्या चरणी करण्यात येत आहे.बहादरपूरच्या मातीतील एका तरुणाने आपल्या कर्तृत्वाने जागतिक ज्ञानविश्वात उमटवलेला ठसा ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची आणि नव्या पिढीसाठी प्रेरणेची बाब ठरली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!