ब्रेकिंग

मानवी तस्करी प्रकरणातील आरोपींना १० वर्षांची शिक्षा; अंजनापूरच्या रामदास गव्हाणे यांचा पोलीस आयुक्तांकडून गौरव!

मानवी तस्करी प्रकरणातील आरोपींना १० वर्षांची शिक्षा; अंजनापूरच्या रामदास गव्हाणे यांचा पोलीस आयुक्तांकडून गौरव!

मानवी तस्करी प्रकरणातील आरोपींना १० वर्षांची शिक्षा; अंजनापूरच्या रामदास गव्हाणे यांचा पोलीस आयुक्तांकडून गौरव!

कोपरगाव । प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीच्या मानवी तस्करी व लैंगिक शोषणाच्या गंभीर प्रकरणाचा यशस्वी तपास करून आरोपींना न्यायालयाकडून १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल अंजनापूर येथील पोलीस कर्मचारी रामदास गव्हाणे यांचा छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.दि. २१ जानेवारी २०२४ रोजी हर्सूल पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी संगनमत करून बांगलादेशातून पाच लाख रुपये देऊन अल्पवयीन मुलीची मानवी तस्करी केली होती. तिला महाराष्ट्रात आणून जबरदस्तीने देहविक्रीच्या व्यवसायात ढकलण्यात आले होते. तसेच तिला डांबून ठेवून तिचे शारीरिक व लैंगिक शोषण करण्यात आले होते.

या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्याचा तपास गोपनीय पद्धतीने करण्यात आला. तपासादरम्यान हर्सूल येथील राधास्वामी कॉलनी परिसरातून तीन आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर योग्य दिशेने तपास करून आरोपींविरुद्ध पुरावे संकलित करण्यात आले. या प्रकरणात न्यायालयाने आरोपींना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.या प्रकरणातील उत्कृष्ट तपास, कर्तव्यदक्षता आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी रामदास गव्हाणे यांना प्रशंसापत्र देऊन गौरविले.अंजनापूर गावचे सुपुत्र रामदास गव्हाणे यांनी पोलीस दलात बजावलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल अंजनापूर परिसरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!