दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणार सिद्धी साई दिंडीची पालखी! मुंबई ते शिर्डी पदयात्रेत १५१ शेतकऱ्यांना मदतीचा हात

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणार सिद्धी साई दिंडीची पालखी! मुंबई ते शिर्डी पदयात्रेत १५१ शेतकऱ्यांना मदतीचा हात

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणार सिद्धी साई दिंडीची पालखी! मुंबई ते शिर्डी पदयात्रेत १५१ शेतकऱ्यांना मदतीचा हात
मुंबई । प्रतिनिधी । भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा अनोखा संगम घडवून आणणारा आगळावेगळा उपक्रम सिद्धी साई दिंडीच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. केवळ साईबाबांच्या दर्शनासाठी पालखी घेऊन शिर्डीला जाण्यापुरते मर्यादित न राहता, दुष्काळग्रस्त आणि गरजू शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आर्थिक मदत देण्याचा स्तुत्य संकल्प दिंडीने केला आहे. त्यामुळे यंदाच्या पालखी सोहळ्याला सामाजिक सेवेची अनोखी किनार लाभणार आहे.
भक्तीला सामाजिक सेवेची जोड!
साईबाबांच्या पालखीचा प्रवास मुंबईहून शिर्डीपर्यंत होणार असला, तरी या प्रवासाचे खरे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक टप्प्यावर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणारी मदत! पालखी ज्या ज्या भागातून जाईल, त्या त्या भागातील गरजू शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार ५०० रुपयांची मदत देण्यात येणार आहे. अशा एकूण १५१ शेतकऱ्यांना मदत करण्याचा संकल्प म्हणजे केवळ आर्थिक सहकार्य नव्हे, तर संकटात असलेल्या बळीराजाला दिलेला माणुसकीचा आधार आहे. ‘शेतकरी जगला तरच जग जगेल’ हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविणारा सिद्धी साई दिंडीचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
सिद्धी साई दिंडी (रजि.), साई मंदिर, हाफकिन परिसर, परळ, मुंबई यांच्या वतीने दि. १६ सप्टेंबर २०२७ ते २२ सप्टेंबर २०२७ या कालावधीत मुंबईतील सिद्धी साई दिंडी चौक (हाफकिन, परळ) ते श्रीक्षेत्र शिर्डी अशी पायी पालखी पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. या पालखी सोहळ्याचे यंदा ४३ वे वर्ष असून, अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही भक्तिमय परंपरा सामाजिक कार्याच्या माध्यमातून अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.यंदाच्या पालखी महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे पदयात्रेदरम्यान पालखी ज्या ज्या भागातून मार्गक्रमण करेल, त्या त्या भागातील दुष्काळग्रस्त आणि गरजू शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना प्रत्येकी २ हजार ५०० रुपयांची रोख मदत देण्यात येणार आहे. पालखीच्या प्रत्येक टप्प्यावर स्थानिक गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत एकूण १५१ शेतकऱ्यांना मदत करण्याचा संकल्प असून, त्यासाठी ३ लाख ७७ हजार ५०० रुपयांची मदत वितरित केली जाणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना मदत घेण्यासाठी कुठेही जाण्याची गरज न पडता दिंडीचे कार्यकर्ते थेट त्यांच्या बांधावर पोहोचून मदतीचा हात देणार आहेत.’शेतकरी हा आपला अन्नदाता आणि पोषणकर्ता आहे. तो जगला तर आपण जगू,’ ही भावना या उपक्रमाच्या केंद्रस्थानी आहे. शेतकरी संकटात असताना समाजाने त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. धार्मिक परंपरेला सामाजिक जाणिवेची जोड देत साईभक्तांनी बळीराजाच्या मदतीसाठी पुढाकार घेणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.श्री सद्गुरू साईबाबांच्या समाधीला १०८ वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने यंदाचा पालखी सोहळा विशेष भक्तिभावाने आणि सामाजिक बांधिलकीने साजरा करण्यात येणार आहे. मुंबई ते शिर्डी हा पायी प्रवास करताना साईनामाचा गजर, पालखीचे दर्शन आणि त्यासोबतच विविध भागांतील गरजू शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

या उपक्रमाचे संस्थापक श्री. गणेश सिताबाई राजाराम पालेकर असून, अध्यक्ष श्री. प्रसाद रा. मांजरेकर, चिटणीस श्री. संतोष बा. भेकरे, कोषाध्यक्ष श्री. विलास भि. सावंत आणि कार्याध्यक्ष श्री. राजाराम प. कांदळगांवकर हे नियोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत.साईभक्ती ही केवळ मंदिरातील दर्शनापुरती मर्यादित नसून, संकटात असलेल्या माणसाच्या मदतीला धावून जाण्यातही खरी भक्ती आहे, हा माणुसकीचा संदेश सिद्धी साई दिंडीच्या या उपक्रमातून समाजासमोर येत आहे.



