बहादरपूर ते आळंदी पालखी दिंडी सोहळ्यात आज ह.भ.प. साईराम महाराज रहाणे यांची कीर्तनसेवा!

बहादरपूर ते आळंदी पालखी दिंडी सोहळ्यात आज ह.भ.प. साईराम महाराज रहाणे यांची कीर्तनसेवा!

पिंपरणे येथे सायंकाळी ६ वाजता रंगणार भक्तिरसाचा सोहळा
संगमनेर । प्रतिनिधी । श्री क्षेत्र बहादरपूर ते श्री क्षेत्र आळंदी देवाची पालखी दिंडी सोहळा २०२६ भक्तिमय वातावरणात सुरू असून, या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी ह.भ.प. साईराम महाराज रहाणे यांच्या कीर्तनरूपी सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपरणे येथे सायंकाळी ६ वाजता हा कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे.संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तीचा आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा वारसा जपत बहादरपूर ते आळंदी देवाची पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून विठ्ठलनामाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि संतांच्या विचारांचा जागर केला जात आहे.

या सोहळ्यात ह.भ.प. साईराम महाराज रहाणे आपल्या कीर्तनातून संत साहित्य, अध्यात्म, भक्ती, समाजप्रबोधन आणि जीवनमूल्यांचा संदेश देणार आहेत. त्यांच्या कीर्तनसेवेचा लाभ परिसरातील भाविक, वारकरी आणि ग्रामस्थांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि सद्गुरू गोपाजी बाबा यांच्या आशीर्वादाने पार पडणाऱ्या या पालखी दिंडी सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.



