ब्रेकिंग
संगमनेर दूध संघाच्या चेअरमनपदी रमेश गुंजाळ यांची निवड

संगमनेर । प्रतिनिधी । महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे मा. महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करत आपल्या गुणवत्तेने राज्य पातळीवर लौकिक मिळवलेल्या संगमनेर तालुका सहकारी दूध संघाच्या चेअरमनपदी रमेश लहानभाऊ गुंजाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे.

राजहंस दूध संघ येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात संचालक मंडळाची विशेष बैठक संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाचे संतोष कोरे हे होते. तर याप्रसंगी माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांची अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये संचालक पदासाठी फॉर्म भरल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी दूध संघाच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी ही निवड झाली आहे.आजच्या विशेष सभेत चेअरमनपदाच्या निवडीची सूचना ज्येष्ठ संचालक संतोष निवृत्ती मांडेकर यांनी मांडली, तर त्यास विक्रम शिवाजीराव थोरात यांनी अनुमोदन दिले. चेअरमनपदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक अधिकारी संतोष कोरे यांनी रमेश लहानुभाऊ गुंजाळ यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी व्हा. चेअरमन राजेंद्र पा. चकोर, ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव कुटे, विलासराव वर्षे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबनराव कुऱ्हाडे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, भारत मुंगसे, प्रमोद पावसे, सौ. प्रतिभाताई जोंधळे, श्रीमती मंदाताई नवले, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदी उपस्थित होते. प्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.

रमेश गुंजाळ यांना जेष्ठ कार्यकर्ते लहान भाऊ पाटील गुंजाळ यांचा सामाजिक कार्याचा मोठा वारसा मिळाला आहे. ते खांडगाव येथील प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांनी गाव पातळीसह विविध सहकारी संस्थांमध्ये काम केले आहे. याचबरोबर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे दहा वर्ष म्हणून संचालकपद त्यांनी भूषवले आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात तरुणांच्या संघटनांसह खंडेश्वर देवस्थान माध्यमातून देवस्थानच्या विकासातही मोठे काम केले आहे. या निवडीनंतर खांडगाव व परिसरातील कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.नवनिर्वाचित चेअरमन यांच्या निवडीबद्दल राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, विधान परिषदेचे सदस्य आ. सत्यजित तांबे, एकविरा फाऊंडेशनच्या संस्थापक व युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ .जयश्रीताई थोरात, जिल्हा बँकेचे व्हाइस चेअरमन रणजितसिंह देशमुख, सौ दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ मैथिलीताई तांबे,पांडुरंग पाटील घुले, ॲड माधवराव कानवडे, संपतराव डोंगरे ,सुधाकर जोशी, शंकरराव खेमनर, आर. बी. राहाणे, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष मा. बाजीराव पा. खेमनर, इंद्रजीत भाऊ थोरात, रामहरी कातोरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. लहानुभाऊ गुंजाळ, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, साखर संघाचे उपाध्यक्ष मा. प्रतापराव ओहोळ, हौशीराम सोनवणे,अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, राजेंद्र कडलग, नूर मोहम्मद शेख, सौ अर्चना बालोडे, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर व सर्व संचालक मंडळ इतरांनी अभिनंदन केले आहे.

राजहंस दूध संघाचा लौकिक कायम ठेवत काम करणार
थोर स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी सन १९७७ साली दूध संघाची स्थापना केली. राज्याचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आणि संघाचे संचालक मा. रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. मा. संचालक मंडळाला सोबत घेऊन सर्वसामान्य शेतकरी दूध उत्पादक यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपण पूर्ण कार्यक्षमतेने काम करू —– रमेश गुंजाळ, चेअरमन राजहंस दूध संघ