वाढदिवसाला हार-तुरे, बुके नकोत; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांचे आवाहन

वाढदिवसाला हार-तुरे, बुके नकोत; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांचे आवाहन

वाढदिवसाला हार-तुरे, बुके नकोत; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांचे आवाहन
अहिल्यानगर । प्रतिनिधी । राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांसह सर्वसामान्य नागरिक विविध अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला आहे. यंदा वाढदिवसानिमित्त हार, बुके, भेटवस्तू किंवा कोणत्याही प्रकारचे साहित्य आणू नये, असे नम्र आवाहन त्यांनी समर्थक, कार्यकर्ते आणि हितचिंतकांना केले आहे.राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांसह सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडले आहेत. शेतीतील पिकांचे नुकसान, आर्थिक संकट आणि दैनंदिन गरजांची पूर्तता करताना नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचा अनावश्यक खर्च करून उत्सव साजरा करण्याऐवजी समाजातील गरजू आणि संकटग्रस्त नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे अधिक महत्त्वाचे असल्याची भूमिका डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. दुष्काळाच्या काळात शेतकरी बांधवांना आधार देणे, सामाजिक बांधिलकी जपणे आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी पार पाडणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी आपल्या आवाहनातून स्पष्ट केले आहे.
प्रेम आणि शुभेच्छा हाच मोठा सन्मान!
वाढदिवसानिमित्त मिळणारे प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद हीच आपल्यासाठी सर्वात मोठी भेट आणि सन्मान आहे. त्यामुळे समर्थकांनी हार, बुके, भेटवस्तू किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे साहित्य आणू नये. अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त बांधवांच्या पाठीशी उभे राहावे आणि सामाजिक बांधिलकी जपावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा दिवस नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित करण्याची संधी आहे. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना मदतीचा हात देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या या आवाहनातून सामाजिक संवेदनशीलता आणि दुष्काळग्रस्तांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित होत आहे.



