ब्रेकिंग

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच प्रतिक शेळके यांचा स्तुत्य पुढाकार; १०१ रक्तपिशव्यांचे संकलन, पुस्तकतुलेतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच प्रतिक शेळके यांचा स्तुत्य पुढाकार; १०१ रक्तपिशव्यांचे संकलन, पुस्तकतुलेतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच प्रतिक शेळके यांचा स्तुत्य पुढाकार; १०१ रक्तपिशव्यांचे संकलन, पुस्तकतुलेतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

अहिल्यानगर । प्रतिनिधी । वाढदिवसाचे औचित्य साधून समाजातील गरजू घटकांसाठी विधायक उपक्रम राबविण्याचा आदर्श अकोळनेरचे सरपंच प्रतिक शेळके यांनी घालून दिला. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातून तब्बल १०१ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सरपंच प्रतिक शेळके यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आयोजित केलेल्या शिबिरात अनेकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला. रक्तदानाच्या माध्यमातून रुग्णसेवेला हातभार लावण्याचा प्रयत्न या उपक्रमातून झाला.याच ठिकाणी डॉ. सुजय विखे पाटील यांची पुस्तकतुलाही करण्यात आली. त्यांच्या वजनाइतक्या पुस्तकांची व शालेय उपयोगी साहित्याची तुला करून हे साहित्य गरजू विद्यार्थ्यांना भेट स्वरूपात देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळावे आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी विशेष कौतुक करून सरपंच प्रतिक शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. तरुण लोकप्रतिनिधींनी विकासकामांसोबतच सामाजिक प्रश्नांबाबतही संवेदनशील राहून पुढाकार घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.यावेळी डॉ. विखे पाटील यांनी वाढदिवस साजरा करताना अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले. सध्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी बांधव अडचणींचा सामना करीत आहेत. अशा वेळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून द्यावे तसेच सामाजिक आणि सेवाभावी संस्थांना शक्य ते सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमांतून समाजातील गरजू घटकांना प्रत्यक्ष मदत मिळते आणि वाढदिवसाचे औचित्यही अधिक अर्थपूर्ण ठरते, असे त्यांनी नमूद केले.या प्रसंगी अकोळनेर येथील ग्रामस्थ, रक्तदाते तसेच प्रतिक शेळके यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!