जिद्द, मेहनत अन् गुणवत्तेच्या जोरावर गायत्री पोहोचली जपानमध्ये; आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते सन्मान!

जिद्द, मेहनत अन् गुणवत्तेच्या जोरावर गायत्री पोहोचली जपानमध्ये; आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते सन्मान!

जिद्द, मेहनत अन् गुणवत्तेच्या जोरावर गायत्री पोहोचली जपानमध्ये; आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते सन्मान!
कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील जवळके गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी अभिमानास्पद कामगिरी गायत्री रामभाऊ थोरात हिने केली आहे. जपानमधील नामांकित ओपन अप कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड या कंपनीत सिव्हिल इंजिनिअर तथा बांधकाम व्यवस्थापन अभियंता म्हणून तिची निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते गायत्रीचा सन्मान करण्यात आला.
जवळकेच्या कन्येची भरारी, गावाच्या अभिमानात भर!
ग्रामीण भागातील मुलींनी केवळ स्थानिक संधींपुरते मर्यादित न राहता जागतिक स्तरावर आपली स्वप्ने पूर्ण करण्याचे ध्येय ठेवावे, याचे प्रेरणादायी उदाहरण गायत्री रामभाऊ थोरात हिने घालून दिले आहे. जपानच्या नामांकित कंपनीत अभियंता म्हणून मिळालेली संधी ही तिच्या कष्टांची पावती असून अनेक विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
जवळके येथील ज्येष्ठ नेते लक्ष्मणदादा थोरात यांची नात असलेल्या गायत्रीने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर थेट जपानमधील नामांकित कंपनीत स्थान मिळवले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब ठरले आहे.गायत्रीने २०२६ मध्ये बी.टेक. सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच तिने सातत्य, अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या करिअरचे ध्येय निश्चित केले. तिच्या या प्रयत्नांना यश मिळत जपानसारख्या प्रगत देशातील नामांकित कंपनीत अभियंता म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे जवळकेसह कोपरगाव तालुक्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल आयोजित सत्कार समारंभात आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते गायत्रीचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार काळे यांनी गायत्रीच्या यशाचे विशेष कौतुक केले. ग्रामीण भागातील मुलीने आपल्या मेहनतीच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर थेट जपानमधील नामांकित कंपनीत अभियंता म्हणून संधी मिळवणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. गायत्रीच्या यशामुळे इतर विद्यार्थिनींनाही शिक्षणातून मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी गायत्रीने जपानमधील अनुभव, तेथील कामकाजाची पद्धत आणि जपानी भाषेतील संवाद याबाबत उपस्थितांशी संवाद साधला. तिचा आत्मविश्वास आणि भविष्यातील वाटचालीबाबतची तयारी पाहून उपस्थितांनी तिचे कौतुक केले.याप्रसंगी माजी सरपंच बाबुराव भाऊ थोरात, ज्येष्ठ नेते लक्ष्मणदादा थोरात, माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, आप्पासाहेब थोरात, सूर्यभान थोरात, कानिफनाथ थोरात, दत्तात्रय थोरात, शिवाजी काका थोरात, संजय शिंदे, गोरक्षनाथ वाकचौरे, तात्या थोरात,सैरभ थोरात, कृष्णा थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.गायत्रीच्या या यशामुळे ग्रामीण भागातील मुलींनाही जागतिक स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची प्रेरणा मिळणार आहे. परिस्थिती कोणतीही असली तरी शिक्षण, मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवरही यश संपादन करता येते, हे गायत्री थोरात हिने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून पुढील वाटचालीसाठी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



