निळवंडेच्या पाण्याचा विस्तार आणखी तीन गावांपर्यंत; आ. आशुतोष काळेंच्या पुढाकाराने पाण्याचा मार्ग मोकळा!

निळवंडेच्या पाण्याचा विस्तार आणखी तीन गावांपर्यंत; आ. आशुतोष काळेंच्या पुढाकाराने पाण्याचा मार्ग मोकळा!

निळवंडेच्या पाण्याचा विस्तार आणखी तीन गावांपर्यंत; आ. आशुतोष काळेंच्या पुढाकाराने पाण्याचा मार्ग मोकळा!
कोपरगांव । प्रतिनिधी । निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रातील जवळके, धोंडेवाडी, शहापूर आणि बहादराबाद या गावांना थेट निळवंडेचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा केल्यानंतर अजून तीन गावांना थेट निळवंडेचे पाणी मिळणार असून त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी प्रत्यक्षात पाहणी करून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.चालूवर्षी भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कालव्यांच्या आवर्तनावर ते आवर्तन गोदावरी कालव्यांचे असो वा निळवंडे कालव्यांचे त्यावर आमदार आशुतोष काळे बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे निळवंडे कालव्याच्या सुरु असलेल्या आवर्तनातून चार गावांची अडचण दूर केल्यानंतर बहादरपूर, अंजनापूर आणि रांजणगाव देशमुखच्या पश्चिम भागातील पाझर तलाव व बंधारे चालू आवर्तनातून भरले जावेत यासाठी त्यांनी मंगळवार (दि.२४) रोजी शेतकऱ्यांसह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत खोकड विहीर पॉईंट येथे प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली.यावेळी टेल राईट वितरिकेतून हे तलाव व बंधारे भरता यावेत यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत.

चालूवर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असून निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये पाणी उपलब्ध असतांनाही एकही गाव आवर्तनापासून वंचित राहू नये व पाण्याच्या समस्या निर्माण होवू नये यासाठी आमदार आशुतोष काळे यांचा आटापिटा सुरु आहे. त्यासाठी निळवंडे कालव्याच्या सुरु असलेल्या आवर्तनातून आमदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून ओढ्यात ७०० मीटर खोदकाम करून बहादरपूर, अंजनापूर आणि रांजणगाव देशमुख या गावांचे पाझर तलाव व बंधारे भरले जाणार आहेत. परंतु यावरच न थाबता पुढील आवर्तनापूर्वी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने २०० मीटर पाईपलाईन टाकून त्यावर व्हाल्व्ह बसविण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांना दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत.आमदार आशुतोष काळे यांनी घेतलेल्या पुढाकारातून ओढ्यात ७०० मीटर खोदकाम करून पाझर तलाव व बंधारे भरले जाणार असल्याने बहादरपूर, अंजनापूर आणि रांजणगाव देशमुख या गावांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून त्यांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. या पाहणी दौऱ्याप्रसंगी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता शुभम शिरसाठ, ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी, तसेच अंजनापूर आणि बहादरपूर आणि रांजणगाव देशमुखचे शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेणारे नेतृत्व; आ. आशुतोष काळेंची तत्परता कधीही विसरणार नाही – गोपीनाथ रहाणे
निळवंडेच्या पाण्यापासून बहादरपूरचा पश्चिम भाग वंचित राहत असल्याची व्यथा आमदार आशुतोष काळे यांच्याकडे मांडली. दुष्काळाची तीव्रता आणि शेतकऱ्यांची पाण्यासाठीची तळमळ ओळखून त्यांनी तातडीने या प्रश्नाला प्राधान्य देत तळेगाव शाखेच्या वितरिकांचे काम सुरू करून घेतले. पाणी मिळेल या आशेवर डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांचा पुढाकार मोठा दिलासा देणारा ठरला आहे. पाटबंधारे विभागाशी सातत्याने समन्वय साधत, वेळोवेळी योग्य निर्णय घेत आणि आवश्यक सूचना देत त्यांनी पाण्याचा मार्ग मोकळा केला. दुष्काळाच्या कठीण काळात शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणारे नेतृत्व आम्हाला लाभले दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि तत्परता आम्ही कधीही विसरणार नाही.-गोपीनाथ रहाणे



