ब्रेकिंग

डॉ. सुजय विखे पाटील व राजेश परजणे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांचा सामाजिक उपक्रम!

डॉ. सुजय विखे पाटील व राजेश परजणे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांचा सामाजिक उपक्रम!

वाढदिवसाचे औचित्य साधत ग्रामस्थांच्या लोकसहभागातून दशरथ नाल्यावर चार नळ्या; डांगेवाडी–तळेगाव रस्त्यावरील प्रश्न मार्गी

कोपरगाव । प्रतिनिधी । माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील तसेच गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत डांगेवाडी–तळेगाव रस्त्यालगत दशरथ नाला येथे चार नळ्या टाकण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे, या कामाचा संपूर्ण खर्च स्थानिक ग्रामस्थांनी स्वखर्चातून केला असून, वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत सार्वजनिक हिताचे काम करण्याचा आदर्श ग्रामस्थांनी घालून दिला आहे.

ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कडेला पाण्याचा योग्य निचरा व्हावा, पावसाळ्यात पाण्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होऊ नयेत तसेच नागरिकांना दैनंदिन प्रवासात सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने दशरथ नाला येथे चार नळ्या टाकण्यात आल्या. या कामासाठी आवश्यक आर्थिक खर्च स्थानिक ग्रामस्थांनी एकत्रितपणे उचलला. त्यामुळे हा उपक्रम लोकसहभाग आणि सामाजिक एकजुटीचे उदाहरण ठरला आहे.आजच्या काळात वाढदिवस म्हटले की हार-तुरे, सत्कार आणि शुभेच्छांचा वर्षाव असे चित्र पाहायला मिळते. मात्र, वाढदिवसाचे औचित्य साधून समाजाच्या उपयोगी पडणारे काम करण्याची संकल्पना ग्रामस्थांनी प्रत्यक्षात आणली. डॉ. सुजय विखे पाटील आणि राजेश परजणे यांच्या वाढदिवसानिमित्त सार्वजनिक सुविधेचे काम करून त्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या.गावाच्या विकासासाठी केवळ शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी एकत्र येऊन पुढाकार घेतल्यास स्थानिक प्रश्न मार्गी लागू शकतात, हे या उपक्रमातून दिसून आले. छोट्या-छोट्या कामांमधून सामाजिक बांधिलकी जपण्याबरोबरच गावाच्या विकासात लोकसहभागाचे महत्त्वही अधोरेखित झाले आहे.या सामाजिक उपक्रमासाठी किसन कांडेकर, यशवंत गव्हाणे, भीकाजी झिंजुर्डे, जालिंदर कांडेकर, नानाभाऊ कांडेकर, अनिल केरे, सीताराम कांडेकर, संजय कांडेकर, सुदाम कांडेकर, गणेश कांडेकर आणि नानासाहेब कांदळकर यांनी पुढाकार घेतला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!