नगरपालिकेने उभे केलेले कवी अनंत फंदी नाट्यगृह अत्याधुनिक – अभिनेते सुबोध भावे



संगमनेरच्या अत्याधुनिक नाट्यगृहात नाट्य प्रयोग करण्यास प्राधान्य नगरपालिका पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन
युवक व ज्येष्ठांची विविध ठिकाणी सेल्फीअत्यंत दर्जेदार आणि अत्याधुनिक झालेले कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह हे सर्वांच्या कुतूहालाचा विषय ठरले आहे तालुका व शहरातील युवक युवती मोठ्या संख्येने नाट्यगृहाला भेट देत असून या झेन जी बरोबर ज्येष्ठ नागरिक ही विविध ठिकाणी सेल्फी ला प्राधान्य देत आहे.
प्रत्येक व्यक्तीला गावाला परिसराला एक स्वतःचा इतिहास असतो तो आपण जपला पाहिजे पुढच्या पिढ्यांना सांगण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. संगमनेर शहर व तालुका हा सुसंस्कृत तालुका म्हणून राज्यभरात ओळखला जातो .संगमनेरने विकासातून समृद्धतेतून आपली ओळख राज्यात निर्माण केली आहे. संगमनेरला साहित्य कला व संस्कृतीची मोठी परंपरा लाभली आहे. ती आपण जपली पाहिजे.येणाऱ्या काळामध्ये मुलाखती बरोबरच येथे नाट्य प्रयोग करायला आवडेल असेही त्यांनी सांगितले यावेळी नवीन अद्यावत असलेले कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह पूर्णपणे भरले होते. सुबोध भावे यांनी कवी अनंत फांदी नाट्यगृहाचा आवर्जून उल्लेख केल्या वेळी उपस्थित रसिकांनी टाळ्यांनी भरभरून दाद दिली.
नाट्यगृहाबाबत संगमनेरचे नागरिक व रसिक आनंदी
संगमनेर नगर परिषदेने लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्तेची तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेले अत्याधुनिक नाट्यगृह ही अत्यंत सुसज्ज व अत्याधुनिक आहे.1000 आसन क्षमता व सर्व सोय युक्त असलेले हे नाट्यगृह सर्वांसाठी आनंद देणारे आहे. अनेक दिवसाच्या कामांमधून हे नाट्यगृह उभे राहिले असून सर्व नागरिक व रसिक आम्ही समाधानी आहोत यामध्ये कोणीही राजकारण करू नये सर्वसामान्य नागरिक आनंदी हेच सर्वात महत्त्वाचे असल्याची भावना उपस्थित शेकडो नागरिक व महिलांनी व्यक्त केली.



