ब्रेकिंग

मोठ्या शहरांत जाण्याची गरज संपली! लोणीच्या प्रवरात २०० हून अधिक उपचार मोफत

मोठ्या शहरांत जाण्याची गरज संपली! लोणीच्या प्रवरात २०० हून अधिक उपचार मोफत

मोठ्या शहरांत जाण्याची गरज संपली! लोणीच्या प्रवरात २०० हून अधिक उपचार मोफत

लोणी । प्रतिनिधी । ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या अभिमत विद्यापीठाच्या ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि प्रवरा मेडीकल ट्रस्टचे डॉ. विठ्ठ्लराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रूग्णालय, लोणी येथे एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत आता २०० हून अधिक अतिरिक्त मोफत वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया उपचारासाठी मान्यता मिळाली असल्याची माहीती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी दिली.

पूर्वी केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव असलेल्या या विस्तारित मोफत आरोग्य सुविधा आता थेट प्रवरा मेडीकल ट्रस्टचे डॉ. विठ्ठ्लराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रूग्णालय, लोणी येथेच उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना प्रगत आणि विशेष उपचारांसाठी मोठ्या शहरांमध्ये लांबचा प्रवास करण्याची गरज उरलेली नाही.पात्र लाभार्थ्यांसाठी योजनेअंतर्गत समाविष्ट असलेले सर्व उपचार, शस्त्रक्रिया, निदान चाचण्या आणि रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च १०० टक्के मोफत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सुलभ मार्गदर्शन आणि नोंदणीसाठी रुग्णांनी आपले आयुष्मान कार्ड, रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना विशेष मदत कक्षाशी संपर्क साधावा. नोंदणी कक्ष संपर्क क्र. ०२४२२-२७११४४.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!