प्रशासकीत सेवेत कार्यरत राहून जोपासलेली कलेची अभिव्यक्ती या स्पर्धेच्या निमिताने पाहायला मिळाली – मंत्री विखे पाटील
राज्यातील संस्कृतीचे नृत्याच्या माध्यामातून घडवलेले दर्शन सर्वाचे लक्ष वेधून घेणारे ठरले

प्रशासकीत सेवेत कार्यरत राहून जोपासलेली कलेची अभिव्यक्ती या स्पर्धेच्या निमिताने पाहायला मिळाली – मंत्री विखे पाटील


राज्यातील संस्कृतीचे नृत्याच्या माध्यामातून घडवलेले दर्शन सर्वाचे लक्ष वेधून घेणारे ठरले
शिर्डी । प्रतिनिधी । शास्त्रीय संगीताची जोपासलेली आवड,जुन्या नव्या मराठी हिंदी गाण्या बरोबरच सांस्कृतिक स्पर्धेमध्ये विविध नाट्य कलाकृतीचे सादरीकरण करून जलसंपदा विभागातील अधिकारी आणि कर्मचार्यांनी महाराष्ट्राच्या लोकधारेचे अनोखे दर्शन घडवले.

जलसंपदा विभागाच्या वतीने राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन केले आहे.साईबाबा संस्थानच्या शासकीय प्रशिक्षण संस्थेतील सभागृहात सुरू असलेल्या सांस्कृतिक स्पर्धेत विभागातील अनेक अधिकारी कर्मचार्यांनी विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करून उपस्थितीतांची मन जिंकली.

दोन दिवसांपासून सांस्कृतिक स्पर्धाना सुरूवात झाली आहे.स्पर्धेत सहभागी झालेल्या कालाकरांनी महाराष्ट्राच्या लोकधारेचे दर्शन घडवले. शास्रीय गायनापासून ते जुन्या हिंदी गाण्याचे गायन करून कलाकरांनी स्पर्धेत चांगला रंग भरला आहे.मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांस्कृतिक स्पर्धाना हजेरी लावून प्रशासानातील कलाकरांना दाद दिली.राम जी की निकली सवारी या गाण्यावरील नृत्याने अवघे साईबाबा सभागृह राममय झाले.कडक लक्ष्मी महाराष्ट्राची परंपरा असलेले गोंधळी नृत्य, तसेच भारतील इतर राज्यातील संस्कृतीचे नृत्याच्या माध्यामातून घडवलेले दर्शन सर्वाचे लक्ष वेधून घेणारे ठरले.

पहील्या दिवशी विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी एकत्रित येवून नाट्य कलाकृतीचे दर्शन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा प्रामुख्याने सर्वच स्पर्धकांच्या सादरीकरणात दिसून आला.प्रशासकीत सेवेत कार्यरत राहून जोपासलेली कलेची अभिव्यक्ती या स्पर्धेच्या निमिताने पाहायला मिळाली.यासर्व स्पर्धाचा पारीतोषिक वितरण समारंभ सोमवारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच विभागातील सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.



