ब्रेकिंग

बिसलेरी कंपनीत निवड झालेल्या तेजस थोरात यांचा जवळके येथे थोरात परिवाराच्या वतीने सन्मान!

बिसलेरी कंपनीत निवड झालेल्या तेजस थोरात यांचा जवळके येथे थोरात परिवाराच्या वतीने सन्मान!

बिसलेरी कंपनीत निवड झालेल्या तेजस थोरात यांचा जवळके येथे थोरात परिवाराच्या वतीने सन्मान!

कोपरगाव । प्रतिनिधी । संगमनेर येथील अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन या व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थी तेजस थोरात यांची नामांकित बिसलेरी इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनीमध्ये सेल्स ऑफिसर या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल आज जवळके येथे थोरात परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या

तेजस थोरात यांनी आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या प्लेसमेंट प्रक्रियेतून त्यांना नामांकित कंपनीत काम करण्याची संधी मिळाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर ओळख असलेल्या कंपनीत नोकरी मिळविल्याने जवळके गावाच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.आज जवळके येथे आयोजित सत्कारप्रसंगी संजय थोरात, बाळासाहेब थोरात, राजीव थोरात, दत्तात्रय थोरात यांच्यासह थोरात परिवारातील सदस्य उपस्थित होते. यावेळी तेजस यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. तसेच भविष्यातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अशीच यशाची शिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.अमृतवाहिनी व्यवस्थापन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता व्यावसायिक कौशल्य, संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे दिले जातात. त्याचाच सकारात्मक परिणाम म्हणून तेजस थोरात यांना नामांकित कंपनीत नोकरीची संधी मिळाली आहे.तेजस यांच्या या यशामुळे थोरात परिवारासह जवळके परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!