ब्रेकिंग

प्रेमाची माणसं हीच आयुष्याची खरी श्रीमंती!’ आमदार सत्यजित तांबे यांचा दिवाळीनिमित्त भावस्पर्शी शुभेच्छा संदेश!

प्रेमाची माणसं हीच आयुष्याची खरी श्रीमंती!’ आमदार सत्यजित तांबे यांचा दिवाळीनिमित्त भावस्पर्शी शुभेच्छा संदेश!

‘पैसा व्यवहारासाठी, तर प्रेमाची माणसं जगण्यासाठी!’ या भावस्पर्शी संदेशातून मित्र परिवार आणि नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा

संगमनेर । प्रतिनिधी । दिवाळी हा केवळ दिव्यांचा आणि रोषणाईचा सण नसून माणसांमधील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि नाती अधिक दृढ करण्याचा सण आहे. याच भावनेतून विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी मित्र परिवारासह सर्व नागरिकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुभेच्छा संदेशाने नात्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

‘प्रयत्न माझा एवढाच असेल, चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी. आपण कधी भेटू अगर न भेटू; पण आपले चांगले विचार कायमच एकमेकांना भेटत राहतील,’ हा विचार मांडताना त्यांनी प्रेमाची माणसे हीच आयुष्यातील खरी श्रीमंती असल्याचे सांगितले आहे.‘लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, अहो पैसा तर फक्त व्यवहारासाठी लागतो; जगण्यासाठी लागतात ती फक्त प्रेमाची माणसं… अगदी तुमच्यासारखी!’ या हृदयस्पर्शी शब्दांतून त्यांनी माणुसकी, मैत्री आणि नात्यांचे अनमोल स्थान अधोरेखित केले आहे.आजच्या धावपळीच्या आणि व्यवहारप्रधान जीवनात माणसांमधील नाती जपणे, चांगले विचार एकमेकांपर्यंत पोहोचवणे आणि प्रेमाची माणसे आयुष्यभर जोडून ठेवणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव या संदेशातून करून देण्यात आली आहे. आमदार सत्यजित तांबे मित्र परिवाराच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाची दिवाळी लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यांच्या या अनोख्या आणि भावस्पर्शी शुभेच्छा संदेशाची विशेष चर्चा होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!