ब्रेकिंग

SS MILK परिवाराकडून दूध संकलन केंद्र चालकांचा गौरव; रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते सन्मान!

 दुष्काळी परिस्थितीतही दूध उत्पादकांना आधार देणाऱ्या सेंटर चालकांच्या कार्याचा गौरव; सचिन व संतोष  यांच्या उद्योगशीलतेचे रेणुकाताईंकडून कौतुक

SS MILK परिवाराकडून दूध संकलन केंद्र चालकांचा गौरव; रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते सन्मान!

दुष्काळी परिस्थितीतही दूध उत्पादकांना आधार देणाऱ्या सेंटर चालकांच्या कार्याचा गौरव; सचिन व संतोष  यांच्या उद्योगशीलतेचे रेणुकाताईंकडून कौतुक

कोपरगाव  । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथील SS MILK उद्योग समूहाच्या वतीने दीपावलीनिमित्त परिसरातील दूध संकलन केंद्र चालकांचा गौरव व सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते सर्व सेंटर चालकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी दूध उत्पादक शेतकरी, सेंटर चालक आणि SS MILK परिवारातील सर्व सदस्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

दूध संकलन केंद्र चालक हे ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे घटक आहेत. शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन दूध संकलित करणे, त्याची योग्य पद्धतीने हाताळणी करणे आणि वर्षभर सातत्याने मेहनत घेणे, अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी ते पार पाडतात. त्यांच्या या कष्टाची दखल घेऊन दीपावलीच्या निमित्ताने त्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम SS MILK परिवाराने राबविला.

यावेळी रेणुकाताई कोल्हे यांनी SS MILK उद्योग समूहाच्या कार्याचे कौतुक केले. सागर आणि सचिन रहाणे यांनी प्रतिकूल परिस्थितीत उभा केलेला उद्योग निश्चितच कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागात उद्योग उभारून परिसरातील अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, ही मोठी बाब आहे. आजच्या काळात दुधाची शुद्धता आणि गुणवत्ता टिकवून ठेवणे आव्हानात्मक झाले असताना SS MILK परिवाराने त्यासाठी घेतलेली काळजी महत्त्वपूर्ण आहे. या उद्योगातून इतर तरुणांनीही प्रेरणा घ्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

oplus_0

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि दूध उत्पादक अडचणीत आले असताना त्यांना योग्य मोबदला मिळणे गरजेचे आहे. पशुखाद्याच्या वाढत्या किमतींचा विचार करून शासनाने पशुखाद्यावर अनुदान देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी दूध व्यवसायाला बळ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी माजी सरपंच बंडुभाऊ थोरात, साईराम महाराज रहाणे, बाबासाहेब नेहे यांच्यासह परिसरातील दूध संकलन केंद्र चालक, शेतकरी आणि SS MILK परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

oplus_0

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश रहाणे यांनी केले. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत कैलास रहाणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन माजी सरपंच कैलास रहाणे यांनी मानले. दीपावलीच्या आनंदात कष्टकरी दूध संकलन केंद्र चालकांच्या कार्याचा गौरव करणारा हा उपक्रम उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!