ब्रेकिंग

दूध उत्पादकांच्या कष्टांचा सन्मान – भाऊ रहाणे

अविनाश दूध संकलन केंद्राचा कौतुकास्पद उपक्रम; रॅबिट मिठाई किट व १५ किलो साखरेचे वाटप

दूध उत्पादकांच्या कष्टांचा सन्मान – भाऊ रहाणे

अविनाश दूध संकलन केंद्राचा कौतुकास्पद उपक्रम; रॅबिट मिठाई किट व १५ किलो साखरेचे वाटप

कोपरगाव । प्रतिनिधी । दिवाळीचा आनंद आणि गोडवा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या भावनेतून श्रीक्षेत्र बहादरपूर येथील अविनाश दूध संकलन केंद्राच्या वतीने दूध उत्पादकांसाठी विशेष दिवाळी भेटवस्तू वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. युवा उद्योजक चिं. अविनाश रहाणे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे दूध उत्पादकांनी स्वागत केले.

या उपक्रमांतर्गत दूध उत्पादकांना दूध दरातील प्रत्येक रुपयामागे ५० पैसे या प्रमाणात रॅबिट व मिठाई किट व १५ किलो साखर भेटवस्तू स्वरूपात देण्यात आली. वर्षभर दूध व्यवसायाच्या माध्यमातून सहकार्य करणाऱ्या उत्पादकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम विशेष ठरला.

या कार्यक्रमाला आरंभ मिल्क डेअरीचे चेअरमन नकुल भाऊ गव्हाणे व ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक आनंदराव गव्हाणे (तात्या) उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते साहेबराव अण्णा रहाणे यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक भाऊसाहेब (भाऊ) रहाणे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दूध उत्पादकांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी उद्योग-व्यवसायाबाबत मार्गदर्शन करताना, दुसऱ्यांची बरोबरी करण्यापेक्षा स्वतःचा छोटासा उद्योग उभा करून त्याचे मालक होणे महत्त्वाचे आहे. व्यवसायात चांगले संपर्क (कॉन्टॅक्ट) आणि दर्जेदार गुणवत्ता (क्वालिटी) जपत सातत्याने पुढे जात राहावे, असा मोलाचा संदेश दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर जी रहाणे यांनी केले, तर त्यांनीच उपस्थितांचे आभार मानले. दूध उत्पादकांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.दूध उत्पादकांच्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा अविनाश दूध संकलन केंद्राचा हा उपक्रम बहादरपूर परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!