ब्रेकिंग

संग्राम पतसंस्थेचा ‘दीपोत्सव’ उत्साहात संपन्न!

संग्राम पतसंस्थेचा ‘दीपोत्सव’ उत्साहात संपन्न!

लॉकर सुविधा व सौर ऊर्जा प्रकल्पाचे दिमाखात उद्घाटन; अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस व भेटवस्तूंचे वाटप

संगमनेर । प्रतिनिधी । संग्राम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर यांच्या वतीने दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘दीपोत्सव’ कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. आरोग्य जागृती, ग्राहकांसाठी आधुनिक सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि कर्मचारी कल्याण अशा विविध उपक्रमांची सांगड घालत संस्थेने दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.

या कार्यक्रमात प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल शेवाळे यांनी उपस्थितांना हृदयाचे आरोग्य जपण्याचे महत्त्व, हृदयरोगापासून बचाव, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैली याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात आरोग्याची काळजी घेणे किती आवश्यक आहे, याबाबत त्यांनी उपस्थितांमध्ये जनजागृती केली.याप्रसंगी संस्थेच्या नूतन लॉकर सुविधा आणि सौर पॅनल प्रकल्पाचे उद्घाटन संस्थापक तथा जय हिंद लोकचळवळीचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. लॉकर सुविधेमुळे ग्राहकांना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याची सुविधा उपलब्ध होणार असून, सौर ऊर्जा प्रकल्पामुळे संस्थेच्या पर्यावरणपूरक आणि आधुनिक वाटचालीला नवी दिशा मिळणार आहे.कार्यक्रमाला महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, संस्थापक डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीतदादा तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. मैथिलीताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, चेअरमन राणीप्रसाद मुंदडा, व्हाईस चेअरमन इंजि. विजय गिरी, बी. आर. चकोर, ॲड. सुहास आहेर व ॲड. बबन वामन आदी मान्यवर उपस्थित होते.या मान्यवरांच्या हस्ते संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि भेटवस्तू प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी संस्थापक डॉ. सुधीर तांबे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक केले. संस्थेची यशस्वी वाटचाल अशीच सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत चेअरमन राणीप्रसाद मुंदडा यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय आरोटे व डॉ. सूचित गांधी यांनी केले, तर आभारप्रदर्शन व्हाईस चेअरमन इंजि. विजय गिरी यांनी केले.याप्रसंगी संस्थेचे संचालक डॉ. नाजिमुद्दीन शेख, विलास दिघे, डॉ. माणिकराव शेवाळे, सूर्यकांत शिंदे, नानासाहेब वर्पे, दत्तात्रय आरोटे, श्रीकांत कोकणे, सुदीप वाकळे, उमेश बोटकर, डॉ. सुचित गांधी, सोमेश्वर दिवटे, ॲड. प्रशांत गुंजाळ, सुलभाताई दिघे, सुनंदाताई दिघे, अनिल सातपुते, सी. ए. अमित कलंत्री यांच्यासह संस्थेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आधुनिक सुविधा, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञतेची भावना जपत संग्राम पतसंस्थेने ‘दीपोत्सव’च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, कर्मचारी कल्याण आणि संस्थात्मक प्रगतीचा सुंदर आदर्श निर्माण केला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!