ब्रेकिंग
काल बातमीतून गौरव, आज जवळके पंचक्रोशीकडून सन्मान; भाऊंच्या कार्याला मिळाली कौतुकाची पावती!
काल बातमीतून गौरव, आज जवळके पंचक्रोशीकडून सन्मान; भाऊंच्या कार्याला मिळाली कौतुकाची पावती!

काल बातमीतून गौरव, आज जवळके पंचक्रोशीकडून सन्मान; भाऊंच्या कार्याला मिळाली कौतुकाची पावती!
कोपरगाव । प्रतिनिधी । पदापेक्षा माणुसकी मोठी आणि प्रसिद्धीपेक्षा समाजसेवा श्रेष्ठ, या विचारातून सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात निःस्वार्थपणे योगदान देणारे बहादरपूरचे भाऊसाहेब राहाणे उर्फ भाऊ यांच्या कार्याची जवळके पंचक्रोशीच्या वतीने विशेष दखल घेण्यात आली. त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत आज त्यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे त्यांच्या सेवाभावी कार्याला एकप्रकारे कौतुकाची पावती मिळाली आहे.

विशेष म्हणजे, भाऊसाहेब राहाणे यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि समाजकार्यावर आधारित वृत्त कालच प्रसिद्ध झाले होते. या वृत्तातून त्यांच्या कार्याची, माणुसकीच्या स्वभावाची आणि प्रसिद्धीपासून दूर राहून समाजासाठी झटण्याच्या वृत्तीची ओळख समाजासमोर आली. त्यानंतर आज जवळके पंचक्रोशीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
भाऊसाहेब राहाणे यांचा सन्मान; निःस्वार्थ समाजसेवेचा केला गौरव, परिसरातून कौतुकाचा वर्षाव
भाऊसाहेब राहाणे हे केवळ स्वतःपुरता विचार न करता गाव, परिसर आणि समाजातील सर्वसामान्य घटकांच्या हिताचा विचार करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळाव्यात, गरजू घटकांना मदतीचा आधार मिळावा आणि गावातील विधायक उपक्रमांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही कामाचा गाजावाजा नाही, प्रसिद्धीची अपेक्षा नाही किंवा पदाचा मोठेपणा नाही. मात्र, समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रामाणिक तळमळ त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते. अशा व्यक्तींच्या कार्याची समाजाने दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे, ही निश्चितच सकारात्मक आणि प्रेरणादायी बाब आहे. जवळके पंचक्रोशीच्या वतीने करण्यात आलेल्या या सन्मानामुळे भाऊसाहेब राहाणे यांच्या सामाजिक कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून, त्यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे. समाजात प्रसिद्धी मिळवणारे अनेक असतात; मात्र माणसांच्या मनात स्थान निर्माण करणारे भाऊंसारखे व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थाने समाजाची संपत्ती असते, अशी भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे.



