ब्रेकिंग

शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करावे -आ.आशुतोष काळे

शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करावे -आ.आशुतोष काळे
शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करावे -आ.आशुतोष काळे
कोपरगांव । प्रतिनिधी ।  गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम सन २०२६-२७ करीता पाटबंधारे विभागाकडून अधिकृत जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. सध्याची दुष्काळी परिस्थिती व पाण्याची वाढती नितांत गरज लक्षात घेता कालव्याच्या आवर्तनाचे योग्य आणि अचूक नियोजन होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी गोदावरी डावा व उजव्या कालव्याच्या  लाभक्षेत्रातील लाभधारक शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज लवकरात लवकर पाटबंधारे विभागाकडे दाखल करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे शेतकऱ्यांना केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात आ.आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्या प्रमाणे गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील दुष्काळाची परिस्थिती विचारात घेऊन जलसंपदा विभागाने रब्बी हंगामातील सिंचनाचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार सर्व प्रकारची हंगामी भुसार पिके, फळबागा तसेच बारमाही उभ्या पिकांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. लाभ क्षेत्रातील पिकांना हंगामाच्या अखेरपर्यंत सुरळीत व वेळेवर पाणी मिळण्यासाठी लाभधारका शेतकऱ्यांनी ७ नंबर पाणी मागणी अर्ज २० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाटबंधारे विभागाच्या संबंधित सिंचन शाखा कार्यालयात जमा करावे. शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज वेळेत जमा केल्यास पाटबंधारे विभागाला उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन सर्व लाभधारकांसाठी आवर्तनांचे योग्य वाटप करता येणार आहे. दुष्काळी परीस्थितीत रब्बी पिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये आणि उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब काटकसरीने वापरणे गरजेचे आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गोदावरी डावा व उजव्या कालव्याच्या जास्तीत जास्त लाभधारक शेतकऱ्यांनी विलंब न करता मुदतीच्या आत आपले नमुना ७ अर्ज जमा करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!