ब्रेकिंग

दीपावली हे आनंदाचे पर्व ; पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा – मा.मंत्री बाळासाहेब थोरात

दीपावली हे आनंदाचे पर्व ; पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा – मा.मंत्री बाळासाहेब थोरात
मांगल्याचे प्रतीक असलेल्या दीपोत्सवातून प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचा प्रकाश निर्माण व्हावा
संगमनेर । प्रतिनिधी । भारतीय संस्कृतीत दीपावली या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घराघरांत प्रज्वलित होणाऱ्या पणत्या अंधार दूर करून प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचा प्रकाश निर्माण करतात. वर्षभर कष्ट करणाऱ्या प्रत्येकाला दीपावलीच्या माध्यमातून आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान नांदावे, अशी सदिच्छा व्यक्त करत सर्वांनी पर्यावरणपूरक दिवाळी आनंदाने साजरी करावी, असे आवाहन काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले.दीपावलीनिमित्त सुदर्शन निवासस्थानी त्यांनी कार्यकर्ते, युवक आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात यांच्यासह संगमनेर शहरातील कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारतीय संस्कृतीत दीपोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या दीपावलीमध्ये लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण उत्साहाने सहभागी होतात. हा सण आनंद, मांगल्य आणि एकोप्याचा संदेश देणारा आहे. वर्षभर प्रत्येक जण कष्ट करतो, विविध अडचणींवर मात करतो. त्यामुळे सण – उत्सव हे जीवनातील आनंद द्विगुणित करण्याचे पर्व असतात. वसुबारस ते भाऊबीज असा हा दीपावलीचा कालावधी कुटुंबीयांना एकत्र आणणारा आणि नात्यांमधील स्नेह अधिक दृढ करणारा आहे.यावर्षी राज्यात कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी अडचणीत आहेत. मात्र, या परिस्थितीतही सर्वांनी चार दिवस आनंदाने आणि एकोप्याने दिवाळी साजरी करावी. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत आनंदाचे वातावरण निर्माण करावे. त्याचबरोबर पर्यावरणाचे संरक्षण, प्रदूषण टाळणे आणि आरोग्याची काळजी घेणे यासाठी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्था व संलग्न संस्थांच्या माध्यमातून उत्पादक, शेतकरी, सभासद, कामगार आणि वाहतूकदार अशा विविध घटकांना दिवाळीनिमित्त आर्थिक सहकार्य मिळाले आहे. सहकाराच्या माध्यमातून सुमारे १६० कोटी रुपये बाजारपेठेत आल्याने संगमनेरची बाजारपेठ फुलली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला सहकार शहराच्या आर्थिक समृद्धीत महत्त्वाची भूमिका बजावत असून सर्वांनी आनंदाने दिवाळी साजरी करावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीत दीपावलीला विशेष महत्त्व असून या सणाच्या निमित्ताने कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात. कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ करणारा आणि जीवनात आनंद निर्माण करणारा हा पारंपरिक सण आहे. प्रत्येकाने दिवाळी साजरी करताना स्वतःच्या तसेच कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!