ब्रेकिंग

नि:स्वार्थ कीर्तनसेवेचा गौरव! ह.भ.प. साईराम महाराज रहाणे यांचा रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते सन्मान

नि:स्वार्थ कीर्तनसेवेचा गौरव! ह.भ.प. साईराम महाराज रहाणे यांचा रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते सन्मान

नि:स्वार्थ कीर्तनसेवेचा गौरव! ह.भ.प. साईराम महाराज रहाणे यांचा रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते सन्मान

कोपरगाव । प्रतिनिधी । कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करताना कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता नि:स्वार्थ सेवा करणारे जवळके येथील ह.भ.प. साईराम महाराज रहाणे यांच्या कार्याची दखल घेत बहादरपूर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

ह.भ.प. साईराम महाराज रहाणे हे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून संतविचारांचा प्रसार करीत असून, कीर्तन व प्रवचनासाठी ते एक रुपयाही मानधन स्वीकारत नाहीत. केवळ भक्तीभाव आणि समाजप्रबोधनाच्या उद्देशाने ते विनामूल्य कीर्तनसेवा देतात. त्यांच्या या सेवाकार्याची पताका महाराष्ट्राबाहेरही पोहोचली असून, मागील महिन्यात त्यांनी गोवा येथेही विनामूल्य कीर्तनसेवा केली.अध्यात्माबरोबरच शिक्षण क्षेत्रातही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. गेल्या पाच वर्षांपासून इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जात आहे. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावला जात आहे.

कोल्हे परिवाराकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा!

ह.भ.प. साईराम महाराज रहाणे यांच्या नि:स्वार्थ सेवाकार्याची दखल घेत विधान परिषदेचे आमदार विवेक भैय्या कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि जिल्हा बँकेचे संचालक बिपिनदादा कोल्हे यांच्या वतीने कोल्हे परिवाराच्या वतीने त्यांच्या सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्याचे कौतुक करून पुढील सेवावाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी कैलास रहाणे, बंडूभाऊ थोरात, बाबासाहेब नेहे, रमेश रहाणे, सचिन रहाणे,संतोष गव्हाणे  यांच्यासह मित्रपरिवार व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

कीर्तनातून संतविचार, संस्कार आणि समाजप्रबोधन, तर कृतीतून विद्यार्थ्यांना मदतीचा हात, अशा दुहेरी स्वरूपात महाराजांचे कार्य सुरू आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्यात मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे. बहादरपूर येथे झालेला हा सन्मान त्यांच्या नि:स्वार्थ सेवाभावाला मिळालेली कौतुकाची पावती ठरला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!