ब्रेकिंग

आमदार सत्यजित दादा तांबे यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

आमदार सत्यजित दादा तांबे यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
जाहिरात – 7756045359

तरुणाईच्या उज्ज्वल भविष्यासाठी संघर्ष, जनतेच्या प्रश्नांसाठी १८-१८ तास कार्यरत; दूरदर्शी नेतृत्वाचा संकल्प

संगमनेर । प्रतिनिधी । तरुणाईच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महाराष्ट्राला महान राष्ट्र बनविण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेले आमदार सत्यजित दादा तांबे यांनी दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आमदार सत्यजित दादा तांबे मित्र परिवार, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आलेल्या शुभेच्छा संदेशातून त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा, जनसेवेच्या कार्यशैलीचा आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाचा परिचय करून देण्यात आला आहे.

जाहिरात – 7756045359

५ जिल्हे, ५४ तालुके आणि ४ हजारांहून अधिक गावांच्या विस्तीर्ण मतदारसंघाचे नेतृत्व करताना जनतेच्या हितासाठी सर्वस्व अर्पण करून १८-१८ तास कार्यरत असणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सत्यजित दादा तांबे यांची ओळख अधोरेखित करण्यात आली आहे.सातत्यपूर्ण जनसंपर्कातून नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणे, ही त्यांच्या कार्यपद्धतीची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. ‘वारसाने संधी मिळते, पण कर्तृत्व सिद्ध करावेच लागते,’ हा विचार त्यांच्या कार्याचा मूलमंत्र असल्याचे या शुभेच्छा संदेशातून मांडण्यात आले आहे.तरुण पिढीला सक्षम बनविणे, त्यांना उज्ज्वल भविष्याच्या संधी उपलब्ध करून देणे आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी योगदान देणे, हा त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीचा केंद्रबिंदू आहे.दीपावलीचा सण प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो, अशी सदिच्छा व्यक्त करत आमदार सत्यजित दादा तांबे यांनी सर्व नागरिकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!