जोर्वे संस्कृतीचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव – मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
जोर्वे गावात 411 नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा

जोर्वे संस्कृतीचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव – मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

जोर्वे गावात 411 नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा

जोर्वे येथील लक्ष्मीआई मंदिरामध्ये गावातील 411 नागरिक व महिलांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, शरद नाना थोरात, एमआयडीसीचे चेअरमन के.के थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्री थोरात, बादशहा बोरकर, विठ्ठल जाधव, अनिल थोरात,संजय थोरात, माणिकराव यादव,संपत थोरात, सोपान कोल्हे,वसंत बोरकर, राजू थोरात, दिगंबर इंगळे, जगन दिघे,कैलास इंगळे, हरिभाऊ इंगळे, दत्तू नाना काकड, बंटी यादव, भाऊसाहेब दिघे,संतोष जाधव, विठ्ठल जाधव,महेंद्र माळी, अमोल दिघे, भारत बलसाने, केशव बलसाने, मुकेश काकड, रमेश दिघे,नारायण वाकचौरे, आशाताई क्षीरसागर, कुसुम दिघे, संगीता काकड, मीना इंगळे आदींसह विविध नागरिक उपस्थित होते. वाढदिवस असलेल्या सर्व नागरिक व महिलांना फेटे बांधून केक कापून सर्वांचा शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, प्रवराकडच्या या जोर्वे संस्कृतीचा उल्लेख आंतरराष्ट्रीय पातळीवर होत आहे. याचबरोबर दिल्ली येथील म्युझियम मध्ये जोर्वे संस्कृतीची माहिती मिळते. या गावाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे.या परंपरेचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे. दामोदर पाटील थोरात यांनी सोसायटीची स्थापना केली तर संतुजी पाटील थोरात हे गावचे पाटील म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतल्यानंतर सहकारात काम सुरू केले. कारखान्यासह सर्व शिखर संस्था सुरू केल्या. प्रत्येक गावामध्ये संस्थांचे जाळे निर्माण केले हीच वाटचाल आपण पुढे कायम ठेवली. राज्य पातळीवर काम केले. तालुक्यासह गावचा लौकिक पुढे नेला.गावातील नागरिकांनी कायम प्रेम करून मोठा पाठिंबा दिला आहे. गावाशी थोरात परिवाराची कायम नाळ जोडलेली असून विविध मंदिरांच्या उभारणीसह गावच्या विकासासाठी आपण कायम काम केले आहे. पंडित तात्या थोरात यांच्या पुढाकारातून दत्त मंदिर सुंदर झाले आहे. गणपती मंदिराचे काम करायचे आहे. गावच्या विकासात कधीही भेदभाव केला नाही. मातीशी कायम इमान राखत गावची नाळ जोडलेली आहे. आपल्या तालुक्याची राजकारणाची चांगली परंपरा आहे. कुटुंब चांगले घडवताना पुढची पिढी चांगली घडली पाहिजे याची काळजी प्रत्येकाने घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सामूहिक सत्काराची ही संकल्पना अत्यंत सुंदर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.यावेळी डॉ.जयश्रीताई थोरात यांनी गावच्या विविध परंपरा बाबत मनोगत व्यक्त केले तर शरद नाना थोरात म्हणाले की, नागरिकांनी पहिले आपसातील मतभेद मिटवले पाहिजे. यावेळी के.के.थोरात,माणिकराव यादव यांच्यासह विविध नागरिकांनी आपले मनोगती व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंद्रजीत भाऊ थोरात यांनी केले तर रामदास काकड यांनी सूत्रसंचालन केले. तर हर्षल काकड यांनी आभार मानले. यावेळी गावातील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



