स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन मध्ये अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा दैदिप्यमान विजय
पाचव्यांदा प्रथम पारितोषिकासह दिड लाख रुपये जिंकले
स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन मध्ये अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा दैदिप्यमान विजय

पाचव्यांदा प्रथम पारितोषिकासह दिड लाख रुपये जिंकले

या प्रकल्पामध्ये उपग्रह व ड्रोनमधून मिळणाऱ्या अचूक प्रतिमा, हवामान माहिती आणि आधुनिक संगणकीय पीक मॉडेल्सचा उपयोग करून शेतामधील पिकांचे उत्पादन आधीच अचूक अंदाजाने मोजण्याची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य नियोजन, खर्चात बचत आणि उत्पादन वाढीस मदत होणार आहे. मानव रचना इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड स्टडीज, फरीदाबाद(हरियाणा) येथे ग्र्यावीटन संघाला प्रथम पारितोषिक मिळवले. धीरज डहाळे (संघ प्रमुख , तृतीय वर्ष , आय टी), चैतन्य थोरात (चतुर्थ वर्ष, कॉम्प्युटर),पराग पाटील (तृतीय वर्ष , कॉम्प्युटर),गायत्री नवलें (तृतीय वर्ष , कॉम्प्युटर), गौरी चॅतुरे(तृतीय वर्ष , आय टी), ईशा सिंग (द्वितीय वर्ष , कॉम्प्युटर) हे विद्यार्थी विजयी संघात होते. ह्या दोन्ही संघाला मार्गदर्शन प्रा. विक्रम अभंग, माजी विद्यार्थी नरेंद्र वखारे यांचे मिळाले.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय बेचाळीस वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकासाची परंपरा हे महाविद्यालय विविध उपक्रमाद्वारे जपत आहे. विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्य विकासासाठी नवनवीन उपक्रम महाविद्यालय द्वारे सतत राबविले जातात. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद व शिक्षण मंत्रालय दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठी डिजीटल उपक्रम स्पर्धा गेली ८ वर्षापासून आयोजित करण्यात येते. सलग ८ वर्षे महाविद्यालयातील विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक ह्या स्पर्धेत सहभाग नोंदवत आहे. आता पर्यंत महाविद्यालयाच्या २० संघांनी अंतिम फेरीत सहभाग नोंदवला तसेच १२ लाख रु. चे बक्षीस मिळाली आहेत. सलग ३६ तास प्रोग्रामिंग कोडींग चालणाऱ्या स्पर्धेतून प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत सहभाग घेता येतो. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी महाविद्यालयीन पातळीवर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्या नियमावली नुसार इंटर्नल हॅकॅथॉन फॉर स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२५ हि स्पर्धा १२ & १३ सप्टेंबर,२०२५ रोजी घेण्यात आली. स्पर्धेमध्ये १३७ संघ आणि ८२२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी ५० संघांची सॉफ्टवेअर व हार्डवेअर एडीशन साठी निवड करण्यात आली. अंतरमहाविद्यालयीन हॅकॅथॉन स्पर्धेचे आयोजन प्रा. विक्रम अभंग , डॉ. स्वाती भोंडे , प्रा. कविता रहाणे यांनी केले. महाविद्यालयातील २ संघांची निवड महाअंतिम फेरी साठी झाली. तसेच विद्यार्थ्यांनी दिलेल्या आयडीयाचे भारत सरकार कडून कॉपीराईटस घेतले आहे.याबरोबरच दुसरा संघ मार्गवेध 3.0 हा एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, गाझियाबाद (उ. प्रदेश) येथे सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय (MoSJE) सामाजिक न्याय और सशक्तिकरण विभागाच्या प्रोब्लेमसाठी सोलुशन दिले. ह्या संघात आदित्य अकोलकर (संघ प्रमुख, तृतीय वर्ष , कॉम्प्युटर), चैतन्य पाटील (तृतीय वर्ष , कॉम्प्युटर) , आदित्य पाटील (तृतीय वर्ष, आयटी), सुहानी पाटील ((तृतीय वर्ष, आयटी), प्रणव खैरे ((तृतीय वर्ष, इलेक्ट्रोनिक्स आणि कॉम्प्युटर), वैष्णवी दुंडे ((तृतीय वर्ष, कॉम्प्युटर) सहभाग नोंदवला.विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,विश्वस्त आ.डॉ.सुधीरजी तांबे, व्यवस्थापकीय विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डायरेक्टर अकॅडमिक्स डॉ.जे.बी.गुरव, प्राचार्य डॉ.एम.ए.वेंकटेश, रजिस्ट्रार प्रा.व्ही.पी.वाघे व संगणक विभाग प्रमुख डॉ.एस.के.सोनकर,आय.टी.विभाग प्रमुख डॉ.बी. एल.गुंजाळ आणि सर्व विभाग प्रमुख व शिक्षकांनी पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन मध्ये पाचवेळा विजेते होणारे अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय हे एकमेव ग्रामीण भागातील महाविद्यालय आहे. आता पर्यंत अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या २० संघांनी अंतिम फेरीत सहभाग नोंदवला तसेच १२ लाख रु. चे बक्षीस मिळाली आहेत.
– डॉ.एम.ए.वेंकटेश, प्राचार्य



