ब्रेकिंग

जोर्वे ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराविरोधात संपूर्ण ग्रामस्थ आक्रमक

एक महिन्यात चौकशी करा अन्यथा संपूर्ण गाव आमरण उपोषण करणार

जोर्वे ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराविरोधात संपूर्ण ग्रामस्थ आक्रमक

जोर्वे ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराविरोधात संपूर्ण ग्रामस्थ आक्रमक
एक महिन्यात चौकशी करा अन्यथा संपूर्ण गाव आमरण उपोषण करणार
संगमनेर । प्रतिनिधी । मागील तीन वर्षापासून जोर्वे ग्रामपंचायतवर विखे गटाची सत्ता असून, आतापर्यंत लाखो रुपयांच्या वस्तूची खरेदी दाखवली दिली गेली आहे, मात्र या वस्तू गावात आलेल्या नाही, याचबरोबर अनागोंदी कारभार व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने समस्त गावकऱ्यांनी आज पंचायत समितीवर घेराव आंदोलन करून या भ्रष्टाचाराची वाभाडे काढले. याचबरोबर पुढील एक महिन्यांमध्ये चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

जोर्वे मधील भ्रष्टाचाराच्या विरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने सर्व ग्रामस्थांनी आज पंचायत समितीला घेराव घातला. यावेळी उपसरपंच बादशहा बोरकर, माणिक यादव ,सुरेश थोरात,  आण्णासाहेब थोरात , हौशीराम दिघे किसन खैरे, दिगंबर इंगळे, संदीप काकड , मुकेश काकड, रावसाहेब दिघे , राजेंद्र थोरात,रावसाहेब नाना काकड, बाळासाहेब चव्हाण, जालिंदर जोर्वेकर, सागर यादव,राजू बलसाने, संजय थोरात ,सुखदेव चव्हाण , पुंजाहरी दिघे, हरिभाऊ इंगळे ,सोपान कोल्हे, गोरख काकड, संतोष जाधव ,संपत थोरात, रावसाहेब लक्ष्मण काकड,शांताराम दिघे, जगन्नाथ दिघे, सुनिल दिघे,विठ्ठल काकड ,राजू शेख, राहुल बोरकर ,अनिल गायकवाड, रावसाहेब यादव, सागर भवर ,भाऊसाहेब दिघे प्रमोद इंगळे ,डॉ. प्रवीण काकड, अक्षय दिघे, बंटी यादव, गणेश इंगळे योगेश जोशी, वसंत बोरकर ,संदीप काकड ,संदीप इंगळे, अनिल थोरात अमोल क्षीरसागर, विद्रोही संघटनेचे अध्यक्ष भास्कर बर्डे , सत्यजित थोरात,सौ मीनाक्षीताई थोरात ,मनीषा दिघे ,संगीता थोरात मंगल काकड ,जयश्री दिघे ,मंगल दिघे लता बर्डे ,ज्योती थोरात ,अनिता काकड आदि उपस्थित होते

       जोर्वे हे संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील गाव असून, या गावांमध्ये सध्या विखे प्रणित आघाडीची सत्ता आहे. मात्र मागील तीन वर्षांमध्ये ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून अनागोंदी कारभार झाला आहे. लाखो रुपयांच्या वस्तू खरेदी झाल्या असून त्या  वस्तू गावांमध्ये आलेल्या नाहीत. याचबरोबर जिल्हा परिषद जन सुविधा निधी २०२४/२५ अनुदान मिळते साठी केलेल्या मुरुमीकरण रस्त्यांचे अनुदान मागणी अर्जात कामापुर्वीचे फोटो व काम पुर्णत्व झाल्यानंतरचे फोटो ,कामाचे दाखविलेले ठिकाण ,अपहार हेतुने चुकीचे (पंचायत समीती कार्यालय संगमनेर)व दिशाभूल करणारे आहे, उपरोक्त दाखविलेले काही रस्ते ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद मालकीचे नसुनही ते नविन केल्याचे भलतीकडेच फोटो जोडलेले आहेत.. तसेच फोटोत  दर्शविलेले रस्ते पुर्वीचेच  शेतकऱ्यांनी स्वखर्चाने केलेले असतांनांही ,व  दाखविलेल्या रस्त्यांचे कोठेही माहीती फलक नाही, असा जवळपास १९ लाखांचा अपहार झालेला आहे.. लेबर चार्जेस , झाडेझुडपे काढणे यांचे मोजमाप व  मुरुम दबाई (Compaction) यांचे आकडे विसंगत आहेत.रस्त्यांची कामे दाखवली आहेत मात्र ती रस्ते झाली नाही. लाखो रुपयांची बाकडे खरेदी झाली असून ती दिसत नाहीत. कुंड्यांची खरेदी केलेली आहे .भ्रष्टाचार व अनागोंदी कारभाराविरोधात ग्रामसभेमध्ये ही ग्रामस्थ अनेक वेळा आक्रमक झाले. याची तातडीने चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली मात्र राजकीय दबावातून कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थ हदबल होऊन पंचायत समितीवर दाखल झाले .

नागरिकांच्या आक्रमकतेपुढे सत्ताधारी गोंधळले

जोर्वे ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराच्या विरोधात ग्रामसभेमध्ये नागरिकांनी आवाज उठवला. भ्रष्टाचाराची मोठी यादीच वाचली यावर कोणतीही उत्तर न मिळाल्याने ग्रामसेवक व सरपंचांविरुद्ध ग्रामस्थ वेळोवेळी आक्रमक झाले मात्र सत्ताधाऱ्यांनी राजकीय वरद हस्तातून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. या विरोधात ग्रामस्थांनी पंचायत समितीला घेरावा घातला….

 ग्रामस्थांनी एकमुखी मागणी करत तातडीने झालेल्या सर्व भ्रष्टाचाराची निपक्षपातीपणे चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. राजकीय वरदस्त लाभलेल्या या मंडळींनी गोरगरिबांचे व आदिवासींचे पैसे लाटून मोठा भ्रष्टाचार केला आहे. आपल्या बगलबच्चाना हाताशी धरून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे . मागील वेळी ग्रामसभेमध्येही याबाबत नागरिकांनी आवाज उठवला मात्र सत्ताधाऱ्यांनी सभेतूनच पळ काढला. या ग्रामसभेची जिल्हाभर चर्चाही झाली आहे, मात्र अद्याप कोणतीही कारवाई होत नाही. येणाऱ्या महिन्यांमध्ये जर या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली नाही तर पंचायत समिती समोर संपूर्ण गाव आमरण उपोषण करेल असा इशारा समस्त ग्रामस्थांनी दिला आहे हे निवेदन गटविकास अधिकारी श्री ठाकुर साहेब व विस्तार अधिकारी कासार साहेब यांनी स्वीकारले.
 
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!