ब्रेकिंग

गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर साई भक्तांची कौतुकाची थाप

जवळके येथे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

जाहिरात
गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर साई भक्तांची कौतुकाची थाप

गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर साई भक्तांची कौतुकाची थाप

जवळके येथे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

कोपरगांव । प्रतिनिधी । साई भक्त परिवार यांच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाला दाद देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साई भक्त सौ.आशा विजय रहाणे होत्या. यावेळी रशमी साईराम रहाणे,मनिषा संदीप दरेकर, जयश्री श्याम नेहे,मोनिका राहुल सरवार, संगीता शिंदे तसेच पालकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांना साईबाबांची प्रतिमा तसेच साईबाबांची शाल व पेन देऊन सन्मान करण्यात आला

🔹 गौरविण्यात आलेले विद्यार्थी:

🥇 वैष्णवी लहानु रहाणे – 88.60
🥈 साहील सोपान गव्हाणे – 86.20
🥉 सिध्दी संदिप रहाणे – 76%

 🥉 प्रियदर्शनी महेश देशमुख – 76%

🥉 विवेक नंदु शेलार – 68 %
🥉मयुरी अरूण शेजवळ – 65%
🥉 प्रियंका गोपीनाथ गव्हाणे – 82%
🥉 पुनम शरद गव्हाणे – 75 %
🥉 श्रद्धा रावसाहेब मोराडे – 66%

विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करत मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. साई भक्तांनी त्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.


या सोहळ्याला ह.भ.प.विजय महाराज रहाणे,भाऊसाहेब ( भाऊ ) रहाणे,राजेंद्र नेहे,साईराम महाराज रहाणे आणि साई भक्त उपस्थित राहुन कार्यक्रम अधिकच संस्मरणीय केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल साईभक्त महिला यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

oplus_2
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!