यशोधन कार्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध दाखल्यांसाठी सुविधा सुरू
माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी व पालकांना दिलासा

यशोधन कार्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध दाखल्यांसाठी सुविधा सुरू
यशोधन कार्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध दाखल्यांसाठी सुविधा सुरू
माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी व पालकांना दिलासा
संगमनेर । प्रतिनिधी । मा.शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी इयत्ता दहावी व बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना लागणारे सर्व दाखले शाळेत देण्यासाठी राज्यभरात ऐतिहासिक योजना राबवली होती. याचबरोबर तालुक्यातील विद्यार्थ्यांकरता यशोधन च्या माध्यमातून सातत्याने दाखले मिळून देण्यासाठी दरवर्षी सुविधा दिली आहे. यावर्षीही डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना सर्व दाखले मिळून देण्यासाठी यशोधन जनसंपर्क कार्यालयामध्ये सुविधा सुरू करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.नितीन भांड यांनी दिली आहे.

जूनमध्ये सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना नवीन वर्गात प्रवेश घेण्यासाठी विविध दाखल्यांची आवश्यकता भासत आहे.एकाच वेळी दाखले काढण्यासाठी पालकांची मोठी गर्दी होत असून अत्यंत गैरसय होते यामुळे तत्कालीन महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या योजनेअंतर्गत ८० लाख विद्यार्थ्यांना शाळेत दाखले मिळाले होते यामुळे वेळे सह खर्चाची मोठी बचत झाली होती.मात्र सरकार बदलले आणि निर्णय बदलले तरीही संगमनेर तालुक्यामध्ये विद्यार्थी व पालकांच्या सोयीसाठी यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून दरवर्षी विविध प्रकारचे दाखले विद्यार्थ्यांना तात्काळ काढून देण्याची सुविधा राबवण्यात आली आहे.

यावर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुद्धा ऑनलाईन झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे.उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, डोमिसाईल, नॅशनॅलिटी, डोंगरी, जात प्रमाणपत्र अशी विविध दाखले काढण्यासाठी पालकांची व विद्यार्थ्यांची तहसील कार्यालयात मोठी गर्दी होत आहे. मात्र एकाच वेळी दाखले उपलब्ध होत नाहीत. प्रशासन गंभीर नसल्याने यासाठी अनेक हेलपाटे मारावे लागत आहे. पालकांची व विद्यार्थ्यांची खर्चाची व वेळेची बचत व्हावी त्याचप्रमाणे त्यांना तात्काळ दाखले मिळावे याकरता कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयांमध्ये स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. तरी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी विविध दाखले काढण्यासाठी यशोधन कार्यालयात संपर्क करावा याचबरोबर अधिक माहितीसाठी 8605321167 आणि 02425 227303 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन यशोधन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
विद्यार्थी व पालकांच्या सोयीसाठी सुविधा
नवीन प्रवेशासाठी लागणाऱ्या अनेक कागदपत्रांची उपलब्धता लवकर होत नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. याचबरोबर अकरावीचे प्रवेश सुद्धा यावर्षी ऑनलाईन झाले आहे. यासाठी ही सर्व दाखल्यांची आवश्यकता लागत असून सर्व विद्यार्थी व पालकांना लवकरात लवकर दाखले मिळावे याकरता यशोधन कार्यालय येथे सुविधा सुरू करण्यात आली असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.