ब्रेकिंग

पोहेगाव येथे संध्याकाळी माळवे यांच्या दुकानावर दरोडा, माळवेसह मुलगा जखमी

ग्रामस्थांनी तलवारीसह चोरटे पकडले, अंगावरचे कपडे काढत बेदाम चोपले,

पोहेगाव येथे संध्याकाळी माळवे यांच्या दुकानावर दरोडा, माळवेसह मुलगा जखमी

पोहेगाव येथे संध्याकाळी माळवे यांच्या दुकानावर दरोडा, माळवेसह मुलगा जखमी

ग्रामस्थांनी तलवारीसह चोरटे पकडले, अंगावरचे कपडे काढत बेदाम चोपले,

शिर्डीचे डीवायएसपी शिरीष वमने घटनास्थळी

पोहेगाव । प्रतिनिधी ।

कोपरगाव तालुक्यातील पोहेगावं मध्ये व्यापारी संकुलात असलेल्या कोळगाव थडी येथील सुवर्ण व्यापारी ज्ञानेश्वर माधवराव माळवे (वय-५५) यांच्या दुकानावर आज सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात तीन दरोडेखोरांनी हातात तलवार घेऊन दुकान लुटून जात असताना नागरिकांनी त्याना रंगेहाथ पकडले आहे,दरम्यान दगडफेक करून ग्रामस्थांनी बाजार तळाजवळ पकडत कपडे काढून बेदम मारहाण केली असून यातील एक दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.या झटापटीत दुकानदार ज्ञानेश्वर माळवे व त्यांचा मुलगा संकेत हा जखमी झाला असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे.दरम्यान आरोपी कडे तलवारी सह गावठी कट्टा, चाकू, सुरे आदी हत्यारे असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी राजेंद्र कोल्हे, सचिन औताडे यांनी दिली आहे.

दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखताच पोलिस विभागीय पोलीस अधिकारी शिरीष वामने यांनी आपले पथकासह घटनास्थळी हजर होऊन आरोपींना आपल्या ताब्यात घेतले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र सदर चोरट्यांनी किती माल गुंडाळला होता याचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही.तसेच पोहेगाव ग्रामस्थांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!