ब्रेकिंग

युवकांनी योग्य वयात आयुष्याची दिशा ठरवताना आपली क्षमता ओळखून करिअरची निवड करण्याची आवश्यकता – देशमुख

युवकांनी योग्य वयात आयुष्याची दिशा ठरवताना आपली क्षमता ओळखून करिअरची निवड करण्याची आवश्यकता – देशमुख

युवकांनी योग्य वयात आयुष्याची दिशा ठरवताना आपली क्षमता ओळखून करिअरची निवड करण्याची आवश्यकता – देशमुख

लोणी । प्रतिनिधी ।

युवकांनी योग्य वयात आयुष्याची दिशा ठरवताना आपली क्षमता ओळखून करिअरची निवड करण्याची आवश्यकता असते. स्वताकडे असलेल्या बुध्दीमतेला ओळखून करीअर घडविण्याचा स्वधर्म सुध्दा स्वताकडे असावा असे मत सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी केले सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमाला वर्ष २४ वे या व्याख्यानमालेमध्ये तिसरे पुष्प व्याख्यानमालेत माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांचे स्पर्धा परीक्षा आणि आजचा युवक या विषयावरती गुंफले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील सहसचिव भारत घोगरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे कॅम्पस संचालक डॉ. आर. ए . पवार फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी,शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना इंद्रजीत देशमुख म्हणाले की २५ वर्षापर्यंत विद्यार्थ्याना जे करायचे ते आपण करू शकता पण शिक्षणासाठी जगा. आपल्याला जे करायचे ते कष्टाने करा. दुसऱ्याचे जगणे समृद्ध करत आपले जीवन सुंदर कसे करता येईल यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे यासाठी आपली क्षमता ओळखून, आपली आवड ओळखून आपल्याला जे आवडते त्याच शिक्षणातून आपण पुढे जावे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपण योग्य असे नियोजन करण्याता सल्ला त्यांनी दिला.सर्व समावेशक बुद्धिमत्ता आणि आपली क्षमता बघून जर आपण यामध्ये उतरलो तर आपल्याला यश हे नक्कीच मिळत असते असे सुचित करून देश उभा करण्यासाठी तरुणांची आज गरज आहे आज स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी अभ्यास करत असताना त्याला अनेक प्रकारच्या संधी या उपलब्ध असतात.वाचना बरोबरच इतरही ज्ञान मिळवणे खूप गरजेचे आहे आत्मविश्वास बहुआयामी व्यक्तिमत्व, सज्जन शिलता ही आवश्यक आहेत मी कोण होणार आहे हा आत्मविश्वास कायम ठेवा संकटावर मात करत आपण पुढे जाणे गरजेचं आहे तरुणांनी शिक्षण घेत असतांना शिक्षणातून घडायचे की बिघडायचं हा निर्णय त्यांनी स्वतः घेणे आवश्यक आहे.मुलांनी आपल्या प्रकाशाने आपले आयुष्य उज्वल करावे असेही त्यांनी सांगून स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांच्या यशोगाथा त्यांचे कष्ट आणि परिश्रम त्यांनी विद्यार्थ्यांसमोर सांगत आपले ध्येय निश्तित करत पुढे जा असे देशमुख यांनी सांगितले.

प्रारंभी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य संजय गुल्हाने यांनी प्रस्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी यांनी तर आभार डॉ. संजय भवर यांनी मानले. व्याख्यानमाले मध्येसमारोपाचे पुष्प शुक्रवार दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी ठाणे येथे अतुल राजोळी यांचे उद्योजकता, संधी, मानसिकता आणि भविष्य यावरती व्याख्यान होणार आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!