ब्रेकिंग
पठार भागातील विस्कळीत आणि गैरसोय निर्माण करणारी परिवहन सेवा सुरळीत करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांचा पुढाकार
युवा नेते गौरव डोंगरे यांच्या मार्फत संगमनेर बस स्थानक आगारप्रमुखांना घेराव

संगमनेर । प्रतिनिधी ।
परिवहन विभागाकडून संगमनेर तालुक्यातील घारगाव-बोटा व एकूणच पठार भागात बऱ्याच ठिकाणी बस सेवा पुरवण्यात आलेली नसून अनेक गावांमध्ये असलेली बससेवा ही खंडित झाल्याने नागरिक,शेतकरी व विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिकतः मुळातच पठार भाग हा डोंगर – दर्यात विखुरल्याने वाड्या,वस्त्या व अनेक लहानमोठ्या गावांना जोडणारा दुवा म्हणून एसटी महामंडळकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जाते, तालुक्याच्या ठिकाणी कमानिमित्त, शिक्षणानिमित्त जायला ह्या बस मार्फत अनेकांचा रोजचा प्रवास असतो मात्र परिवहन खात्याने बसचा तुडवडा किंवा अन्य काही तांत्रिक कारणामुळे पठारभागात अनेक ठिकाणी बससेवा रद्द केली तसेच पोखरी बाळेश्वर, तळेवाडी सारख्या गावात ह्या बस पोहचत देखील नसल्याने विद्यार्थ्यांना रोज पायपीट करत कॉलेज गाठावे लागते.

ह्या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करुन सर्वसामान्य नागरिकांना सुरळीत बससेवा प्रदान करण्यासाठी तातडीने आगारप्रमुखांना भेटून संबंधित समस्या मांडण्याबाबत आमदार सत्यजित तांबे यांनी त्यांचे सहकारी व पठारभागाचे युवा नेतृत्व गौरव डोंगरे यांना सूचना दिल्या. त्यानुसार काल गौरव डोंगरे व सहकाऱ्यांनी संगमनेर बस स्थानकावरील आगारप्रमुखांचे कार्यालय गाठत सर्व समस्या मांडल्या व काही विद्यार्थी आणि नागरिकांनी सूचना देखील तिल्या त्यानुसार आगारप्रमुख श्री.गुंड यांनी संबंधित शिष्टमंडळाला लवकरच कार्यवाहीच्या सूचना करत आश्वस्त केले आणि दूरध्वनीवरून सत्यजित तांबे यांच्याशी संवाद देखील साधला.यावेळी सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, शेखर सोसे, रोहित काळे, सुमित पानसरे, सौरभ उमर्जी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.