ब्रेकिंग

राज्य मार्ग ६५ झगडे फाटा-वडगाव पान रस्त्याच्या दुरुस्तीकडे आ.आशुतोष काळेंनी वेधले सभागृहाचे लक्ष

राज्य मार्ग ६५ झगडे फाटा-वडगाव पान रस्त्याच्या दुरुस्तीकडे आ.आशुतोष काळेंनी वेधले सभागृहाचे लक्ष

कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव मतदार संघातील अत्यंत महत्वाचा व मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारच्या वाहनांची नेहमीच वर्दळ असणाऱ्या राज्य मार्ग ६५ अर्थात झगडे फाटा ते वडगाव पान रस्त्याच्या दुरुतीचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधत लवकरात लवकर या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.

राज्य मार्ग ६५ झगडे फाटा-वडगाव पान रस्त्याच्या दुरुस्तीकडे आ.आशुतोष काळेंनी वेधले सभागृहाचे लक्ष

आ.आशुतोष काळे म्हणाले की, राज्यमार्ग ६५ वरील झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्ता कोपरगाव मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावर बाराही महिने मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. यामध्ये जड वाहतुकीचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश असतो. कोपरगाव मतदार संघाच्या लगतच जगप्रसिद्ध शिर्डीचे श्री साईबाबा देवस्थान असून या ठिकाणी वर्षभर धार्मिक कार्यक्रम व उत्सव सुरु असतात. त्या उत्सवा वेळी शिर्डी संस्थानच्या सुरक्षेच्या दृष्टीने व देश विदेशातून येणाऱ्या साईभक्तांना या वाहतुकीचा त्रास होवू नये यासाठी पूर्वीचा प्रमुख नगर-मनमाड राज्यमार्ग व सध्याचा एन.एच.७५२ जी वरून उत्तरेकडून शिर्डीमार्गे दक्षिणेला येणारी सर्व वाहतूक पुणतांबा फाटा मार्गे याच झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्ता अर्थात राज्यमार्ग ६५ वरून मागील अनेक वर्षापासून वळविली जात आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त वाहनांची वर्दळ या मार्गावरून होत असल्यामुळे हा रस्ता अतिशय खराब झाला होता. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आ.आशुतोष काळे यांनी पाठपुरावा केल्यामुळे राज्य शासनाने १७ कोटी निधी मंजूर करून त्यापैकी १० कोटी निधीतून या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली होती.परंतु मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्यामुळे वारंवार दुरुस्ती करूनही हा रस्ता टिकत नाही.

परंतु दुरुस्ती करूनही हा रस्ता पुन्हा काही ठिकाणी अतिशय खराब झाला होता. ज्या ठेकेदाराला या रस्त्याचे काम दिले आहे त्याच ठेकेदाराला पुन्हा दुरुस्तीचे काम देण्यात आले होते. आजपर्यंत त्या ठेकेदाराकडून आत्तापर्यंत तीन वेळा दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे तरी देखील रस्ता दुरुस्त झालेला नसून झगडे फाटा ते तळेगाव दिघे ह्या १७ किलोमीटरच्या रस्त्यापैकी साडे तीन किलोमीटर रस्ता तर खूपच खराब झाला असून खराब रस्त्यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहे. या रस्त्याला देण्यात आलेल्या सतरा कोटी निधीपैकी शिल्लक असलेला सात कोटी निधी तातडीने देवून या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी केली आहे.

आज जशी अवस्था झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्त्याची (राज्य मार्ग ६५) झाली आहे तशीच अवस्था यापूर्वी पुणतांबा फाटा ते झगडे फाटा या सात किलोमीटर रस्त्याची काही वर्षापूर्वी झाली होती. त्यावेळी तात्कालीन आमदार अशोकराव काळे यांनी तात्कालीन जिल्हाधिकारी डॉ.संजीव कुमार व तात्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांना आपल्या गाडीतून पुणतांबा फाटा ते झगडे फाटा या सात किलोमीटरच्या रस्त्याचा प्रवास घडवला होता. त्यावेळी त्यांना सात किलोमीटरच्या प्रवासासाठी एक तास वेळ लागला. त्यावेळी रस्त्याची विदारक परिस्थिती पाहून तात्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पुणतांबा फाटा ते झगडे फाटा या सात किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल १४ कोटी निधी मंजूर केल्यामुळे हा प्रश्न सोडविण्यात आ.अशोकराव काळे यशस्वी झाले होते.

नागरिकांकडून आ.आशुतोष काळेंच्या भूमिकेचे कौतुक

 झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्ता अर्थात राज्यमार्ग ६५ हा पोहेगाव गटातील व कोपरगाव-संगमनेर-राहाता तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या कोपरगाव मतदार संघातील नागरीकांसाठी अत्यंत महत्वाचा असणारा मार्ग आहे. परंतु या रस्त्यावर प्रमाणापेक्षा जास्त वाहनांची वर्दळ असल्यामुळे हा रस्ता दुरुस्त करूनही पुन्हा अनेक ठिकाणी अतिशय खराब झाला आहे.या रस्त्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे  झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्ता (राज्य मार्ग ६५) ची दर्जोन्नती करुन हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणे बाबत त्यांचा पाठपुरावा सुरु आहे. यावरच न थांबता या रस्त्याचा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत घेतलेल्या भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!