शहीद जवान मेजर संदीप घोडेकर यांचे संगमनेरात स्मारक व्हावे – काँग्रेसची मागणी
काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेला निवेदन

शहीद जवान मेजर संदीप घोडेकर यांचे संगमनेरात स्मारक व्हावे – काँग्रेसची मागणी

काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेला निवेदन
शहीद जवान मेजर संदीप घोडेकर यांचे संगमनेरात स्मारक व्हावे – काँग्रेसची मागणी
घोडेकर यांनी देशासाठी दिलेले बलिदान कायम स्वरणात राहील – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेरचे सुपुत्र मेजर संदीप घोडेकर हे देशसेवा बजावत असताना त्यांना मृत्यू आला. सैनिक हा घरदार सोडून देशाच्या सेवेकरता रात्रंदिवस सज्ज असतो. देश सेवा करताना वीरमरण आलेले हुतात्मा मेजर संदीप घोडेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आणि मनाला वेदना देणारी आहे. त्यांनी दिलेले देशाकरता बलिदान हे संगमनेर करांच्या कायम स्मरणात राहील अशी भावना काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे
हुतात्मा संदीप घोडेकर यांचे हुतात्मे देशासाठी – मा. आमदार डॉ. तांबे
संगमनेर शहरातील घोडेकर परिवारातील मेजर संदीप घोडेकर यांनी कायम देशसेवेला प्राधान्य दिले. देशी सेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या या वीर जवानाने अखेरचा श्वासही सेवेत घेतला. इतक्या लवकर जाणे दुर्दैवी आहे. त्यांच्या परिवाराच्या दुःखात संगमनेर तालुका परिवार सहभागी असून त्यांचे हुतात्मे हे देशासाठी असून सदैव संगमनेर करांना संस्मरणीय राहील अशी भावना माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे