ब्रेकिंग
राजकारण हे सत्तेसाठी नाही तर जनतेच्या कल्याणासाठी – लोकनेते बाळासाहेब थोरात

राजकारण हे सत्तेसाठी नाही तर जनतेच्या कल्याणासाठी – लोकनेते बाळासाहेब थोरात

( लोकनेते बाळासाहेब थोरात यांची Mumbai Tak वर रोखठोक मुलाखत.. )
संगमनेर । प्रतिनिधी । 1985 साली सर्वात कमी वयाचा आमदार म्हणून मी निवडून आलो. मागील 40 वर्ष राजकारणात राहिलो. पराभव हा अनपेक्षितच होता. इतकी मोठी संधी तालुक्यातील जनतेने मला दिली १८ वर्ष मंत्रिमंडळात राहिलो. काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय पातळीवरही मला मोठी संधी दिली. मतदार संघातही मी चांगली विकास कामे केली.
राजकारण हे सत्तेसाठी नाही तर जनतेच्या कल्याणासाठी – लोकनेते बाळासाहेब थोरात
पराभवानंतर संवाद सभा बोलावली त्यावेळी 10 हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित होते. पराभवाचे फार दुःख धरत बसायचे नाही. लोकांची कामे सुरूच आहेत. आजही माझ्याकडे तेवढेच लोक कामानिमित्त येत असतात . सहकारी संस्था खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. यातून अधिक कामाची क्षमता वाढवता येईल. मी काँग्रेस पक्षात टिकून आहे कारण या पक्षाला विचारधारा आहे. काँग्रेस पक्ष हा राज्यघटनेची निगडित आहे. पक्ष संकटात असताना अनेक जण सोडून गेले पण मी गेलो नाही. आम्ही सत्तेचा उपयोग नेहमी लोकांच्या हितासाठीच केला. विधानसभा निवडणुकीत पक्षाची विचारधारा लोकांना समजून सांगण्यात आम्ही कमी पडलो. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी कृषी औद्योगिकीकरणाचा पाया घातला. आणि तो पुढील नेत्यांनी सुरू ठेवला. 1965 रोजी जी देशाची परिस्थिती होती ती काँग्रेस पक्षाने 1990 मध्ये बदलली. देश विविध घटकांच्या बाबतीत स्वयंपूर्ण केला. विविध सहकारी संस्थांची उभारणी करण्यात आली. त्या प्रामाणिकपणे चालवण्यात आल्या. मात्र आता सध्या सहकारी संस्थांना सरकारकडून पाहिजे ती मदत मिळत नाही. आता मात्र प्रत्येक गोष्ट राजकारणासाठी होत आहे. कारखान्यांची कर्ज एम एस सी बी बँक नाकारते. सध्या स्वतःला वाचवण्यासाठी किंवा सत्तेसाठी काहींचे पक्ष परिवर्तन सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. मात्र विधानसभेच्या निकाल हा आश्चर्यकारक होता ही वस्तुस्थिती आहे. भाजपला 90% जागा मिळाल्या याचाच अर्थ या निकालात काहीतरी अनियमितता आहे. तीन महिन्यात मतदार वाढले कसे, हे मात्र अनैसर्गिक आहे. निवडणूक आयोग हाताशी धरून ही कामे करण्यात आली याची पुराव्या सह माहिती पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आहे. माझ्या मतदारसंघात मतदार वाढीची नाही तर धर्माच्या आणि लाडक्या बहिणीच्या मुद्द्यावर निवडणूक झाली. निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर झाला. ८ वेळा मतदारसंघात निवडून आलो त्यामुळे कोणतीही प्रलोभनी लोकांना मी दिली नाही. समोरून आर्थिक पाठबळावर निवडणूक झाली. माध्यमे बरोबर आली तर समजेल की काँग्रेस पक्ष आपली मागणी मांडत असतो .मात्र त्याकडे लक्ष दिले जात नाही. माध्यमांनी सत्य परिस्थितीच्या सोबत राहिले पाहिजे कारण माध्यमे ही लोकशाहीचा कणा आहेत.

मी चळवळीतून आलो आहे. आजही चुकीच्या गोष्टी विरोधात रस्त्यावर उतरण्याची माझी तयारी आहे. काँग्रेस हा पक्ष अडचणीत नसून पक्षाचे तत्त्वज्ञान अडचणीत आहे. आज जरी पक्ष कठीण काळातून जात असला तरी भविष्यात परिवर्तन नक्की होणार आहे. भारतीय जनता पक्ष वेगवेगळी फंडे वापरून निवडणूक जिंकत आहे. आत्ताच मंजूर झालेले जन सुरक्षा बिल हे लोकशाही विरोधात आहे. जनतेने हे ओळखायला हवे. यासाठी आम्हाला जनतेत जावे लागेल. पूर्वी सत्ताधाऱ्यांप्रमाणेच सभागृहात विरोधकांना सन्मान असायचा. आता मात्र दुर्दैवाने तसे नाही. विरोधी पक्षनेते बोलायला लागल्यावर त्याची नोंद घेण्यात यायची व त्यावर कारवाई व्हायची. सत्ताधाऱ्यांनाही आपल्या कामाची सद्यस्थिती सांगावी लागायची. आम्ही मंत्री असताना कधी निधी कमी ज्यादा अशी भांडण करत बसलो नाही. विरोधकांचा निधी अडवला नाही. आता मात्र विरोधकांचा निधी अडवला जात आहे. सभागृहात आता वैयक्तिक द्वेषापर्यंत राजकारण आले असून ही वृत्ती लोकशाहीला पोषक नाही. राजकारण हे विचारांसाठी व तत्वांसाठी केली पाहिजे. वडील स्व. भाऊसाहेब थोरात यांनी मला राजकारणात सत्तेसाठी न जाता विचारधारेसाठी जाण्याचा सल्ला दिला. आणि तोच आपण आयुष्यभर जपला आणि पुढेही जपणार आहोत.असेही ते यावेळी म्हणाले