ब्रेकिंग
वटसावित्री पौर्णिमेनिमित्त आरोग्य शिबिरात 257 महिलांची कॅन्सरसह विविध मोफत तपासणी

एकविरा फाउंडेशन व एसएमबीटीच्या सहकार्यातून महिलांसाठी मोफत तपासणी
संगमनेर । प्रतिनिधी।। भारतीय संस्कृतीमध्ये वटसावित्री पौर्णिमेला मोठे महत्त्व आहे. अध्यात्म आणि परंपरा याचबरोबर महिलांना आरोग्याची जाणीव व्हावी व वाढते कॅन्सरचे प्रमाण हे धोकेदायक असून संभाव्य आजार टाळण्यासाठी एकविरा फाउंडेशनच्या वतीने आयोजित महिला आरोग्य तपासणी शिबिरात 257 महिलांची तपासणी करण्यात आली.

खांडगाव,खांडेश्वर सांस्कृतिक मंगल कार्यालय येथे एकविरा फाउंडेशन व एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट यांच्यावतीने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले यावेळी. सौ दुर्गाताई तांबे , कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ अश्विनी देशमुख, स्त्रिरोगतज्ञ डॉ. विशाखा पाचोरे, डॉ सुवर्णा मेहत्रे, अविनाश आव्हाड, सोमनाथ गुंजाळ ,सुविधा अरासिद्ध , किशोर साळुंखे यांच्यासह विविध वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.या आरोग्य शिबिरात सुमारे 15000 रुपये किमतीच्या कॅन्सर तपासणी मोफत करण्यात आल्या. याचबरोबर रक्तामधील हिमोग्लोबिन, शुगर, डायबिटीस, यांसह महिलांच्या विविध आजारांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण 257 महिलांनी तपासणी करून घेतली.

यावेळी बोलताना कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, वटसावित्री पौर्णिमा हा महिलांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा दिवस आहे या दिवसाला मोठे अध्यात्मिक महत्त्व आहे परंपरा संस्कृती जपताना महिलांनी स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य जपले पाहिजे. आहार आणि व्यायाम हे अत्यंत महत्त्वाची असून सध्या वाढत चाललेले कॅन्सरचे प्रमाण सुद्धा चिंताजनक आहे. योग्यवेळी तपासणी आणि त्यावर उपचार केले तर कॅन्सर पूर्ण बरा होऊ शकतो. कॅन्सर बाबत पहिली फार भीती होती परंतु आता तो पूर्ण बरा होण्याचा विश्वास सर्वांमध्ये निर्माण झाला आहे.लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणी महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर होत आहे यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी स्वतःची आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.तर सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की काही महिलांमध्ये आजारांचे प्रमाण आढळल्यास त्यांना एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून पुढील उपचार केले जातात म्हणून महिलांनी ज्या ज्या ठिकाणी आरोग्य शिबीर असेल त्या ठिकाणी आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी डॉ. विशाखा पाचोरे, डॉ. आश्विनी देशमुख, डॉ. सुवर्णा मेहेत्रे यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने आरोग्याची जाणीव जागृती करून देणारा एकवीरा फाउंडेशन चा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे यावेळी गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरामध्ये युवक व ज्येष्ठ नागरिकांची ही विविध तपासणी करण्यात आली.