ब्रेकिंग
वडगाव पान ऍसिड हल्ल्यातील पिडीत मुलीला 100 दिवसानंतर ही न्याय नाही हे दुर्दैवी -डॉ. जयश्रीताई थोरात

कुटुंबीयांची भेट घेत न्यायाच्या लढाईसाठी सोबत असल्याचा दिला विश्वास
अहिल्यानगर । प्रतिनिधी । महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा परिवार म्हणून जपत सर्व तालुक्याची काळजी घेतली. प्रत्येक कुटुंबीयांशी आत्मीयता आणि जिव्हाळा यामुळे हा तालुका परिवार झाला. संकटे आली तर जनतेच्या पाठीशी ते कायम उभे राहिले. वडगाव पान ऍसिड हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या मुलीला न्याय मिळावा याकरता डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून आज त्यांनी कुटुंबीयांची भेट घेत या मुलीची आस्तेवाईकपणे चौकशी केली. न्यायासाठी आपण खंबीरपणे तुमच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

वडगाव पान येथील छोट्या चिमुकलीवर 17 मार्च 2026 रोजी ऍसिड टाकून अमानुष हल्ला झाला या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. घटनेनंतर डॉ.जयश्रीताई थोरात यांनी तातडीने दवाखान्यांमध्ये जाऊन या मुलीची भेट घेतली. तर तिला न्याय मिळावा याकरता पोलीस प्रशासन आणि शासन दरबारी पाठपुरावा केला. मात्र 100 दिवस होऊनही न्याय न मिळाल्याने नगर येथे जाऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक सुदर्शन यांचीही भेट घेतली. या मुलीच्या चौकशीसाठी त्यांच्या घरी जाऊन मुलीची कुटुंबीयांशी संवाद साधला. याच वेळी मुलीच्या प्रकृतीची चौकशी करत तिला दिलासा दिला याचबरोबर इतके दिवस उलटूनही आरोपी मोकाट फिरत असल्याने पूर्ण तालुक्यात आणि नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. याची दखल घेऊन प्रशासनाने आरोपीला तात्काळ अटक करावी. जेणेकरून अशा नराधमांना धाक मिळेल अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर या चिमुकलीला न्याय मिळेल याकरता लोकशाही मार्गाने आपण सदैव संघर्ष करण्यासाठी तयार असून मुलीच्या समवेत असल्याचे त्यांनी सांगत कुटुंबीयांना धीर दिला.क्षयावेळी वडगाव मधील युवक व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.