ब्रेकिंग
काँग्रेस हा गोरगरिबांचा पक्ष- माजी मंत्री बाळासाहेब थोरात
कोळवाडे येथे आदिवासी मेळावा संपन्न

संगमनेर । प्रतिनिधी । आदिवासी व नाईकराजे हा समाज अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू आहे. या समाजाची शिक्षणातून प्रगती होणारा असून प्रत्येक मुलगा शिकला पाहिजे या करता कार्यकर्त्यांनी काम करावे. तालुक्यातील व राज्यातील गोरगरीब व आदिवासी माणसांच्या विकासाकरता आपण सातत्याने काम केले असून राष्ट्रपिता महात्मा गांधी, इंदिरा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा विचार असलेला काँग्रेस पक्ष हा खऱ्या अर्थाने गोरगरिबांचा पक्ष असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. शबरी माता संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

कोळवाडे येथील जयहिंद आदिवासी आश्रम शाळा येथे शबरी माता संघटना व सकल आदिवासी समाज यांच्या वतीने आयोजित आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी मा.आ. डॉ सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर शबरी माता संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक बर्डे, आदिवासी काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्ष गिरीजा पिचड, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, आदिवासी सेवक प्रा बाबा खरात, तालुकाध्यक्ष सुरज माळी, प्रदीप अहिरे ,आशाताई बर्डे, संतोष माळी, कैलास राजपूत, रावसाहेब ठाकरे, बाळू भिल, रामदास पवार, राहुल माळी, रमेश पवार ,रवींद्र माळी, रामदास माळी, संदीप गायकवाड दीपक अहिरे ,पवन वाघ, सुनील भाऊ मोरे, सुनील सोनवणे, भाऊसाहेब नवले, बाबुराव गोंधे, काशिनाथ गोंधे सोपानराव वर्पे मुख्याध्यापक दशरथ वर्पे सर यांच्यासह विविध कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, संपूर्ण जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी भिल्ल समाजाला नाईक राजे ही उपाधी दिली. अत्यंत कणखर प्रामाणिक आणि कष्टाळू असलेला हा समाज महाराष्ट्रात सर्वत्र प्रामाणिकपणे काम करतो आहे. तो कायम काँग्रेसच्या विचारांच्या पाठीशी राहिला आहे. या समाजाच्या प्रगती करता आपण सातत्याने काम केले असून या समाजातील कार्यकर्त्यांनी यापुढे प्रत्येक घरात जाऊन तेथील मुले शिकली पाहिजे याकरता काम केले पाहिजे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य दिले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना दिली. मताच्या अधिकारामुळे गरिबाला किंमत आली. काँग्रेसने कायम गोरगरिबांच्या विकासासाठी काम केले. महात्मा गांधी इंदिराची गांधी यांची हत्या झाली. राष्ट्रपिता महात्मा गांधी, इंदिरा गांधी राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले.गरिबांची माता असलेल्या इंदिरा गांधी यांच्या शरीराची चाळण झाली. तर राजीव गांधी यांच्या देहाच्या चिंधड्या झाल्या. गरीब माणूस कायम काँग्रेस बरोबर राहील.मात्र सध्या भाजपचे लोक हे जातीचे राजकारण करून दिशाभूल करत आहेत. कायम खोटं बोलत आहे.भेदभाव निर्माण करत आहे. देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी जी मुरमु यांना लोकसभा नवीन इमारत व राम मंदिराच्या उद्घाटनाला न बोलावणे हा आदिवासी समाजाचा अपमान भाजपने केला आहे. भाजपला लोकशाही संपवायची आहे. लढणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या राज्यामध्ये वोट चोरी झाली. शबरी माता संघटना काँग्रेस बरोबर काम करत आहे आनंदाचे आहे राहुल गांधी गोरगरिबांसाठी लढत आहेत.तालुक्यातील आदिवासी व गोरगरिबांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे याकरता 1992 मध्ये आपण ही आदिवासी आश्रम शाळा सुरू केली या शाळेतील अनेक विद्यार्थी चांगले शिकून मोठ्या पदावर काम करत आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध असून मुलांना शिकवा आणि मोठे करा असे आवाहन त्यांनी केले.तर माजी आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले की, आदिवासी बांधव हा कायम प्रामाणिक असतो. कष्टावर त्यांचा विश्वास असतो. मात्र भाजपचे लोक धर्माचे राजकारण करून त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण करत आहे. योजनांचा लाभ हा श्रीमंतांना दिला जात आहे. गरिबाचा विचार केला जात नाही. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी गोरी गरिबांच्या विकासासाठी सातत्याने काम केले आहे. गरिबांचे नेते म्हणून ते आपल्या सर्वांच्या बरोबर कायम उभे आहेत. हा तालुका त्यांनी परिवार म्हणून सांभाळला आहे. यापुढील काळात आपल्या सर्वांना एकत्र येऊन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायचे आहे. याकरता तरुणांनी अधिक सक्रिय काम करावे. सध्याच्या भाजपच्या जुलमी राजवटीविरुद्ध सर्व गरीब नागरिकांनी एकत्र लढावे असे आवाहन त्यांनी केले.तर प्रदेशाध्यक्ष दीपक बर्डे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात हे खऱ्या अर्थाने गरिबांचे नेते आहेत. त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. गोरगरिबांसाठी सातत्याने योजना राबवल्या. काही लोक मन खराब करण्याचे काम करतील परंतु त्यांना जाब विचारा. जनतेसाठी राबणारा आणि कष्ट करणारा नेता म्हणून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी सर्वांनी उभे रहावे. यापुढील काळात शबरी माता संघटनेचे सर्व पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत सैनिक म्हणून भूमिका बजावतील असे ते म्हणाले.यावेळी प्रा.बाबा खरात, सुनील मोरे ,संदीप गायकवाड, गिरीजा पिचड यांनी ही भाषणे केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुरज माळी यांनी केले सूत्रसंचालन बाळकृष्ण गांडाळ यांनी केले तर दिलीप बांबळे यांनी आभार मानले यावेळी संगमनेर तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शबरी माता संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
काँग्रेसचे निष्ठावंत नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष दीपक बर्डे यांच्यासह नाशिक ,जालना, छत्रपती संभाजीनगर ,अहिल्यानगर, जळगाव जिल्हा येथील शबरी माता संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शेकडोंच्या संख्येने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आदिवासी समाजाला वनवासी म्हणून त्यांची हिना केली याचा निषेध करत यापुढील काळामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात या पक्षाच्या विचारांवर राज्यभर काम करणार असल्याचे प्रांताध्यक्ष दीपक बर्डे यांनी सांगितले. यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षामध्ये स्वागत केले.