ब्रेकिंग

आनंदी समाजासाठी जुलै फॉर काइंडनेस – डॉ जयश्रीताई थोरात

जुलै महिना मंथ ऑफ काइंडनेस म्हणून राबवणार

आनंदी समाजासाठी जुलै फॉर काइंडनेस – डॉ जयश्रीताई थोरात

जाहिरात मो-7756055359
जुलै महिना मंथ ऑफ काइंडनेस म्हणून राबवणार
संगमनेर । प्रतिनिधी । सध्या समाजामध्ये सर्वत्र नकारात्मकता वाढली आहे. हे कमी करण्यासाठी, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून दयाळूपणा ,चांगुलपणा वाढवून  मानवतेसाठी आणि आनंदी समाज निर्माण करण्यासाठी दररोज एक कृती चांगली करण्याबरोबर संपूर्ण जुलै महिना हा मंथ ऑफ काइंडनेस म्हणून सर्वांनी राबवावा असे आवाहन कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे. जगभरामध्ये प्रथमच मंथ ऑफ काइंडेनेस ही संकल्पना संगमनेर तालुक्यात राबविण्यात येत आहे. याबाबतची यशोधन कार्यालयात सर्व पत्रकार बांधवांशी संवाद साधण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, जगामध्ये जागतिक युद्ध, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, विविध भडक बातम्या , अत्याचार यामुळे समाजामध्ये नकारात्मकता खूप वाढली आहे. याचा परिणाम पुढील पिढीवर होत आहे.हा समाज आनंदी करण्यासाठी चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी हा जुलै महिना मंथ ऑफ काइंडेनेस म्हणून साजरा करण्यात येणार असून या जुलै महिन्यामध्ये दररोज एक आनंद देणारी कृती प्रत्येकाने करावी. मोठ्या माणसांना मदत करावी, पशु पक्षांना सांभाळावे, पर्यावरण जोपासावे, आजी आजोबांशी गप्पा माराव्यात, आई-वडिलांना कामात मदत करावी, ज्येष्ठांचे बोलणे नम्रतेने ऐकून त्यांना सन्मान द्यावा, आपण आपल्या शाळेत, महाविद्यालयात, आस्थापनेत किंवा ज्या ठिकाणी आहे .त्या ठिकाणी स्वच्छता राबवावी. जे लोक या समाजासाठी, स्वच्छतेसाठी काम करतायेत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठा आनंद निर्माण करता येऊ शकतो.ही संकल्पना विना पैशाची आणि विना कष्टाची आहे. कृतज्ञता आणि दयाळूपणा यामधून समाजामध्ये एकमेकांप्रती जिव्हाळा आणि चांगुलपणा वाढणार आहे. आत्मीयतेचे आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होणार आहे. एक माणसांची कृती 10 माणसांना जोडेल 10 माणसांची 100 माणसांना जोडेल आणि 100 माणसांची दयाळू पणाची कृती हजार माणसांना जोडेल. यातून कृतज्ञता आणि दयाळूपणा याची साखळी तयार होईल आणि हे समाजाच्या व देशाच्या आनंद निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे राहील.जुलै महिन्यामध्ये एकमेकांप्रती असलेली नाराजी दूर करा, आदराने बोला ,एकमेकांना मदत करा, पर्यावरणाचे काम करा, स्वच्छता करा, या कृती करण्यासाठी पैसे नाहीतर इच्छा लागणार आहे. यामुळे काइंडेनेस बरोबर आपल्या गावाचा तालुक्याचा राज्याचा आणि देशाचा हॅपिनेस इंडेक्स वाढणार आहे.या चळवळीमध्ये जे विद्यार्थी ,नागरिक, महिला, युवक सहभागी होतील त्यांना काइंडनेस चॅम्पियन म्हणून जुलै महिन्याच्या शेवटी गौरवण्यात येणार आहे.जुलै महिना हा शांत पावसाचा आणि आनंद देणार आहे. सर्वत्र हिरवाई निर्माण करणारा आहे. या हिरवाईच्या निसर्गाच्या बरोबर आपण सुद्धा मानवतेची हिरवाई निर्माण करू या. दयाळपणातून समाजामध्ये आपुलकी वाढवण्यासाठी सर्वांनी मंथ ऑफ काइंडेनेस या चळवळीमध्ये  सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

तरुणाईची झेनजी  मोठ्या प्रमाणात सहभागी होणार

सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये आनंद निर्माण करण्याकरता मंथ ऑफ काइंडेनेस ही संकल्पना संगमनेर तालुक्यात राबवली जात जाणार असून या आनंदाच्या चळवळीमध्ये तरुणाई बरोबर झेनजीने सहभागी होत आहे . त्यांनी आपल्या संकल्पना राबवाव्या. त्याचबरोबर सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही आनंदी कल्पना पोहोचून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!